IMG-20251225-WA0009

सिंदखेडराजा( अनिल दराडे) सिंदखेड राजा तालुक्यातील रूम्हणा येथील अंगणवाडी केंद्रामध्ये, साने गुरुजी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संदीप कायंदे, हरिभाऊ जायभाये होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तदनंतर अंगणवाडी मधील बालकांनी गाणे म्हणून दाखविले, यावेळी ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते यांनी साने गुरुजी यांचे विचार तसेच श्यामची आई याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका अर्चना आघाव, लता कायंदे, मदतनीस नीता डोळे, मालता काळे, यांनी परिश्रम घेतले, शेवटी बालकांना खाऊ म्हणून बिस्कीट पुड्याचे वाटप करण्यात आले.

You may have missed

error: Content is protected !!