डॉ युवराज म्हस्के यांनी शिबिरात तीनशे रुग्णावर केले मोफत उपचार आणि औषधी वाटप….
सिंदखेड राजा (अनिल दराडे )तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे जिजाऊ हॉस्पिटल च्या वतीने आयोजित मोफत रुग्ण तपासणी शिबिरामध्ये प्रसिद्ध हृदयरोग तज डॉ युवराज म्हस्के आणि त्यांच्या चमुने तीनशे पेक्षा जास्त रुग्णावर मोफत उपचार करून त्यांना महागडी औषधी मोफत वाटप केली
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर गुरुवारला मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन लोकजागर परिवारचे विश्वस्त प्रवीण गीते सामाजिक कार्यकर्ते प्रवीण देशमुख यांच्या हस्ते पत्रकार भगवान साळवे सरपंच यादव टाले यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी डॉ युवराज मस्के यांनी तीनशे पेक्षा जास्त रुग्णाची तपासणी करून त्यांना मोफत औषध दिली. शिबिरामध्ये ब्लड प्रेशर शुगर तपासणी आणि हृदय रोगाची तपासणी या सह विविध आजाराची तपासणी आणि त्यावर उपचार डॉ युवराज म्हस्के यांनी केले यावेळी त्यांना आरोग्य मित्र श्रीधर देवकर कुणाल पैसोडे डॉ आतिश कुंडकर रोहित काकडे अमोल पैठणे यांनी मदत करून औषध वाटप केले
या यावेळी डॉ युवराज म्हस्के यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि पंतप्रधान जन आरोग्य योजना बद्दल माहिती देऊन जिजाऊ हॉस्पिटल मध्ये असलेल्या सुविधाची माहिती सांगितली शिबिर यशस्वीतेसाठी माजी ग्राप सदस्य अर्जुन मगर ग्राप सदस्य राजू साळवे पत्रकार पवन मगर भारत साळवे अशोक पवार संदीप साळवे विशाल साळवे विनेश साळवे विलास मोरे विलास देशमुख भीमराव साळवे अभिमान साळवे पवन तायडे एकनाथ साळवे सुनील मगर उजेश वहिले देवा चरवे आदींनी परिश्रम घेतले
