लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणं ‘या’ महिलांना भोवलं…..
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )बुलढाणा जिल्ह्यात शासकीय महिला कर्मचाऱ्यांकडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यावरून वसुली करण्यात आली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या १९६ शासकीय महिला कर्मचाऱ्यांची एक यादी प्राप्त झाली होती. या यादीची छाननी केली असता, त्यापैकी १९० महिला कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे आढळले. हे उत्पन्न मर्यादेच्या निकषात बसत असले तरी, शासकीय कर्मचारी असल्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यास त्यांना अडचणी आल्याचे दिसते.
या प्रकरणामध्ये सहा कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी १६,५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यापूर्वी नियमावली काळजीपूर्वक तपासणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही कारवाई योजनेच्या अंमलबजावणीतील विशिष्ट नियमांशी संबंधित असल्याचे म्हटले जात आहे.
ही योजना लागू करताना सरकारने काही अटी घातल्या होत्या. लाभार्ती महिलांचं वय 21 ते 65 वर्ष असावं. तसेच त्यांच्या कुटंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC (ई-केवायसी) करणे आवश्यक करण्यात आलं होतं. मात्र, अनेक महिलांचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर असतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरून चुकीची माहिती सादर केली. यात काही नोकरदार महिलाही होत्या. त्यामुळे या महिलांना योजनेचा अर्ज मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, फार थोड्या महिलांनी योजनेतून स्वत:चं नाव मागे घेतलं. ज्यांनी घेतलं नाही, त्यांच्यावर आता कारवाई केली जात आहे
