चिखली तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीचा लाभ घ्यावा,चिखली तहसिलदार विजय सवडे.

Screenshot_2026-01-15-13-25-56-61_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

चिखली (एकनाथ माळेकर) चिखली सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प (रब्बी हंगाम ई पीक पाहणी DCS) ची सुरुवात दिनांक 10 डिसेंबर 2025 पासून सुरू झालेली आहे. आपल्या 7/12 वर पीक पेरा स्वतः शेतकरी यांनी अॅन्ड्राईड फोन व्दारे नोंदणी करायचा आहे. शेतकरी स्तरावर पिक पाहणी करण्यासाठीचा अंतीम दिनांक 24 जानेवारी 2026 पर्यंत आहे.

रब्बी हंगाम 2025 ई पिक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत चिखली तालुक्यात आजपर्यंत 18458.73 है. आर एवढ्या क्षेत्रावर, तसेच एकूण 101565 पिक पाहणी करावयाच्या owner’s प्लॉटपैकी 17485 प्लॉटवर सबंधित शेतकऱ्यांनी आपल्या पीकांची ई पीक पाहणी DCS व्हर्जन 4.0.5 या मोबाईल अॅप द्वारे आपल्या 7/12 वर नोंदणी केलेली आहे. आजवर चिखली तालुक्यात डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत ई पीक पाहणीची नोंदणी 18.92% क्षेत्रावर झालेली आहे. उर्वरीत क्षेत्रावर सर्व शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी अॅपव्दारे पीकांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सदर पीक पाहणीची नोंदणी ई पीक पाहणी व्हर्जन 4.0.5 या मोबाईल अॅप व्दारे करतांना अॅन्ड्रॉईड फोन आवश्यक आहे. सदर अॅप गुगल क्रोम अपडेट करून मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यावे. ई पीक पाहणी अॅप व्दारे शेत बांधावर जावून पीकांची नोंदणी करून माहिती अपलोड करावी. सदर कामी संबंधीत शेतक-याजवळ मोबाईल उपलब्ध नसल्यास अथवा हाताळता येत नसल्यास, संबंधीत गावाचे तलाठी, कोतवाल तसेच संबंधीत गावात नियुक्त केलेले सहायक यांची मदत घेवून आपल्या पीकांची नोंदणी ई पिक पाहणी अॅप व्दारे करून घेण्यात यावी. सदर अॅप विषयी काही अडचण असल्यास संबंधीत गावाचे तलाठी तसेच कॉमन सर्व्हिस सेंटर, आपल्या गावातील DCS करिता नियुक्त सहाय्यक यांची मदत घ्यावी.

ई पीक पाहणी व्दारे पीकांची नोंदणी न केल्यास आपल्या 7/12 वर पीक पेरा कोरा राहील. जो नंतर भरता येत नाही त्यामूळे पीक विमा, व इतर शासकीय अनुदान व लाभ मिळविण्यास अडचण निर्माण होईल. अवेळी पाऊस किंवा इतर नैसर्गीक आपत्ती या बाबत पिक विमा मिळण्यासाठी 7/12 वर अचूक पीक नॉद असणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने सर्व शेतकरी बांधवांनी 24 जानेवारी 2026 पुर्वी आपल्या पिकांची नोंदणी करून घेण्यात यावी, असे आवाहन विजय सवडे, तहसीलदार, चिखली यांच्या वतीने करण्यात येत आहे.

You may have missed

error: Content is protected !!