एन.आय.एस प्रशिक्षक देवानंद नेमाने यांची खेलो इंडिया विंटर गेम आईस हॉकी निवड चाचणी सदस्य म्हणून निवड

Screenshot_2026-01-15-14-29-30-48_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

निलेश कोल्हे

चिखली:- ६ व्या खेलो इंडीया विंटर गेम्स-२०२५-२६” चे आयोजन लेह-लदाख व जम्मू-काश्मिर राज्यात निश्चित झाल्याबाबत सदर स्पर्धा ही खुल्या वयोगटांत होणार असून आईस हॉकी या खेळप्रकाराचे आयोजन दि. २० जानेवारी २०२६ पासून करण्यात येणार असल्याचेही संदर्भिय पत्रानुसार कळविले आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार, पहिल्या टप्यात लेह-लद्दाख येथे आयोजित होणाऱ्या आईस हॉकी या खेळप्रकारांमध्ये महाराष्ट्र राज्याचा पुरुष संघ पात्र ठरला असून सदर खेळांच्या राज्यस्तरीय निवड चाचणीचे आयोजन खालीलप्रमाणे निश्चीत करण्यात आले आहे. स्व. मीनाताई ठाकरे स्केटिंग क्रीडा संकुल निगडी पुणे येथे 13 जानेवारी 2026 रोजी आयोजित केली होती यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्या मधून खेळाडू खेलो इंडिया विंटर गेम साठी निवड चाचणीसाठी उपस्थित झाले होते. या खेळाची निवड चाचणी घेण्यासाठी व निवड समिती सदस्य म्हणून श्री देवानंद नेमाने एन.आय.एस प्रशिक्षक रोलबॉल बुलडाणा यांची निवड झाली होती निवड झाल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी महानकर सर महाराष्ट्र टीम आईस हॉकी खेलो इंडिया क्रीडा कार्यालय व कोच मॅनेजर सपोर्टिव्ह स्टॉप
श्री. युवराज नाईक, विभागीय उपसंचालक,
डॉ.श्री. चंद्रशेखर साखरे, सहाय्यक संचालक, (राज्याच्या क्रीडा विभागाचे प्रतिनिधी)
श्री सुरेश काकड तालुका क्रीडा अधिकारी पुणे श्री पुरुषोत्तम जगताप राज्य संघटना
सय्यद लाईक ,इमरान खान सय्यद निसार अजय जगताप व बुलढाणा जिल्ह्यातील सर्व क्रीडा परिवारांनी शुभेच्छा दिल्या

You may have missed

error: Content is protected !!