नियोजन शून्य कारभारामुळे चिखली भूमिअभिलेख कार्यालयाकडून अनेक बाबतीत शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवा अन्यथा आंदोलन !
चिखली( एकनाथ माळेकर ) चिखली तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय हे दलाला चा अड्डा बनले आहे सर्वसाधारण व्यक्तीचे काम होत नाही आणि दलाल चे कामे होतात असे चित्र चिखली भूमी अभिलेख विभागात दिसुन येत आहे
मातृ तीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने शेती व शेतकरी या दृष्टीने सर्वात मोठा व समृद्ध असणारा चिखली तालुका या तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचे केंद्र बिंदू बनले आहे भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून मिळणाऱ्या नकले साठी शेतकऱ्यांना नावाचे आवाचे सव्वा पैसे मोजावे लागत आहे सविस्तर म्हणजे शेतकऱ्यांना एखादा अर्ज ऑनलाईन करायचा असेल तर ठराविक एकाच ऑनलाइन केंद्राचे नाव सुचवल्या जाते चिखलीतील इतर ऑनलाईन केंद्रांना फॉर्म भरण्याची परवानगी नाही ज्याचे नाव सुचवला जाते ती व्यक्ती शेतकऱ्याकडून शासनाच्या नियमापेक्षा खूप जास्त पैसे वसूल करतात खरंतर हे पैसे वसूल केल्या जातात अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच मग यामध्ये अधिकाऱ्यांचा वाटा आहे का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो शिवाय अनेक शेतकऱ्यांना नकाशाच्या मोठ्या मोठ्या झेरॉक्स हवे असतात सदर झेरॉक्स काढण्यासाठी शेतकऱ्यांना सांगण्यात येते की सदर झेरॉक्स करण्यासाठी जे आमच्याकडे मशीन नाही ती बुलढाण्याहून आणावे लागते त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त पैसे द्यावे लागतील काही नकलाचे मूल्य 50 ते 60 रुपयाच्या आत असताना त्याची सुद्धा अवाजवी वसुली केल्या विशेष म्हणजे या विभागामध्ये असणारे अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विनंती चा आवाज येत नाही शेतकऱ्यांच्या केविलवाण्या आवाजापेक्षा दलालाची भाषा त्यांना जास्त लवकर समजते म्हणून या विभागांमध्ये सदर दलालांची सुद्धा संख्या दिवसेंदिवस वाढत आहे या सर्वच प्रकारातून भूमी अभिलेख कार्यालय हे सध्या शेतकऱ्यांच्या पिळवणुकीचे केंद्र बनले असून आपण तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या कुण्या एकाच ऑनलाईन सेंटरवर काम न करता तालुक्यामध्ये इतर ऑनलाइन सेंटरला परवानगी देण्यात यावी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रत्येक नकलेचे शासकीय दर फलक ऑफिसला लावण्यात यावे शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दलालांना दूर ठेवण्यात यावे या सर्व मागणीचा आपण गांभीर्यपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयामध्ये दहा दिवसानंतर कोणत्याही क्षणी अभिनव आंदोलन करू अश्या आशयाचे निवेदन युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर शेतकरी नेते विनायक सरनाईक समाधान गाडेकर,मंगरूळचे सरपंच दामोदर शिंदे अनिल चव्हाण तानाजी चिकणे कमलाकर शेटे महेंद्र कुमार वायकोस राकेश चोपडा अशोक ठोंबरे विजय राजपूत गजानन काळे रविशंकर कुटे कैलास चौरे भास्कर नरवाडे यांच्यासह अनेकांच्या सह्या असलेले निवेदन तहसीलदार यांना दिले आहे
