मेरा बु येथे खंडोबा महाराज यात्रा महोत्सव सुरु,तीन दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम,शनिवारी महाप्रसादाने होणार सांगता.
चिखली (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील पंधरा हजार लोकसंख्येचे गाव असलेले मेरा बु येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खंडोबा महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून दिनांक १७ जानेवारी २०२६ वार शनिवारला महाप्रसादाने यात्रेची सांगता होणार आहे.दिनांक १५ जानेवारी ते १७ जानेवारी पर्यंत भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये १५ जानेवारी रोजी झी टॉकीज फेम ह.भ. प गजानन महाराज लोणकर यांचा रात्री ८ वाजता कीर्तनाच्या कार्यक्रमाने या यात्रेला सुरुवात होणार असून, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.३० वाजता वाघे मुरळी चा कार्यक्रम तसेच शनिवार दिनांक १७ जानेवारी २०२६ रोजी खंडोबा महाराजांची आरती नंतर खंडोबा महाराज मंदिरापासून गावामधून दिंडी सोहळ्यास प्रारंभ होऊन सायंकाळी चार वाजता महाप्रसादाला सुरुवात होऊन यात्रेची सांगता होणार आहे.या यात्रा महोत्सवाचा पंचक्रोशीतील भक्तांनी लाभ घेण्याचे श्री.खंडोबा महाराज मंदिर संस्थान मेरा बुद्रुक तसेच समस्त गावकरी मंडळी मेरा बुयांनी केले आहे.
