गटांच्या माध्यमातून महिला सक्षम बनतील – नायब तहसीलदार प्रांजल पवार,पुरुषांच्या बरोबरीने महिलाही तेवढ्याच सक्षम – डॉ भाग्यश्री खेडेकर…..
बुलढाणा (सचिन खंडारे) 27 जानेवारी रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील आशीर्वाद लॉन येथे महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा बुलढाणा व नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत लोकसंचलित साधन केंद्र साखरखेर्डा यांच्या वतीने महिला सक्षमीकरण अंतर्गत ज्या पुरुषांनी महिलांना सहकार्य केले त्यांना सक्षम बनवले अशा पुरुषांचा सन्मान म्हणून सुधारक सन्मान पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते ‘
सदर या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सिंदखेडराजा नायब तहसीलदार प्रांजल पवार मॅडम होत्या , तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर ‘ लोणार पंचायत समितीच्या माजी सभापती तथा ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई इंगळे , साखरखेर्डा सरपंच ज्योती जाधव ,गीताताई संदीप मगर सौ रेखा रामभाऊ जाधव ‘ बचत गटाचे अध्यक्ष कमलाबाई जाधव ,शिंदी पोलीस पाटील वैशालीताई हाडे साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड ‘ ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे
माजी सरपंच कमलाकर गवई सुमेध गवई
यांचे प्रमुख उपस्थिती होती ,
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले, त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यवस्थापक आशा शरद सरकटे यांनी केले ‘
त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणामधून कशाप्रकारे कामे केली जातात याची माहिती सांगितली , नंतर
मान्यवरांच्या हस्ते २५ जणांना सन्मान सुधारक पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले ,
गणेश गवई ‘ प्रदीप खरात .नितीन कंकाळ ‘ सोहम गवई , विनोद सौभागे ‘भीमराव काळे ‘विशाल गवई ‘विशाल मंडळकर ‘शिवाजी खरात ‘सत्यनारायण काळुसे ‘प्रदीप जाधव ‘ सुनील तांगडे ‘गजानन सांगळे ,प्रल्हाद गवई विजय भालेकर .राजेंद्र देशमुख ,शिवाजी ठोसरे ‘अमोल गवई ‘ जयसिंग चव्हाण संजय जाधव ‘प्रशांत साळवे ‘ यांचा सन्मान सुधारक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला .
यामध्ये ‘ सायाळा वरुडी मोहाडी सावंगी भगत रताळी सवडद राजेगाव सा . खेर्डा कंडारी भंडारी ,तांदुळवाडी गुंज आंबेवाडी गोरेगाव शिंदी पिंपळगाव मोहखेड जणूना तांडा
लोणी लव्हाळा , बाळसमुद्र अशा विविध गावांमधून एका व्यक्तींना सन्मान सुधारक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ,
त्यानंतर मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार प्रांजल पवार यांनी सांगितले की महिलांना घर आणि इतर कामे बाहेर नोकरी असेल अशी दुहेरी संघर्ष करावा लागतो परंतु या संघर्ष मधून सुद्धा महिला पुढे जात आहे बचत गटांचे काम कौतुकास्पद आहे ‘
त्यानंतर डॉ भाग्यश्री खेडेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत , बचत गटाच्या माध्यमातून महिला आपले कामे व्यवस्थित रित्या करत आहेत ‘
महिलेला कामासाठी पुरुषांची मदत घ्यावी लागते त्यामुळे पहिल्यांदा एका महिला कार्यक्रमांमध्ये पुरुषांचा सुद्धा सन्मान होत आहे हे खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाची नांदी आहे ,
त्यानंतर लोणार पंचायत समितीच्या माजी सभापती वर्षाताई इंगळे यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना सांगितले की महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे प्रत्येक काम महिला बारकाईने करत असतात ‘
त्यानंतर सरपंच सौ ज्योती जाधव यांनी सुद्धा महिलांना शुभेच्छा दिल्या ‘
यामध्ये पत्रकार अशोक इंगळे सचिन खंडारे समाधान सरकटे देविदास सरकटे डी .एन . पंचाळ सर यांचा सुद्धा आयोजकाच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विदया कळगे यांनी केले तर आभार गोदावरी इंगळे यांनी केले ‘
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहयोगिनी ‘ रेखा पवार ‘ आशाताई राजगुरू , आशा राजेगावकर ,कमल परांडे यांनी परिश्रम घेतले ‘
