प्रकटदिन सोहळ्याकडे भाविकांचे लक्षश्री संत गजानन महाराज प्रकटदिन सोहळा रविवारी दुसरबिडयेथे धार्मिक उत्सव

Screenshot_2026-02-07-21-28-20-80_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेड राजा (अनिल दराडे )सिंदखेडराजा — तालुक्यातील दुसरबिडयेथे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिनानिमित्त रविवारी होणाऱ्या भव्य सोहळ्याची जय्यत तयारी पूर्ण झाली असून संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे. या सोहळ्याकडे परिसरातील भाविकांचे लक्ष लागले असून मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.दुसरबिडयेथील श्री गजानन महाराज मंदिरात श्री संत गजानन महाराजांचा 11वा प्रकटदिन सोहळा येत्या रविवार, माघ वद्य ७, दि. 08/02/2026 रोजी रविवार रोजी भक्तिभावात साजरा होणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत शोभायात्रा काढण्यात येणार असून त्यानंतर सकाळी 8ते दुपारी 9०० या वेळेत पारयाणसकाळी 11वाजाता काल्याचे किर्तन दोन आपल्या आगमानारेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.हा सोहळा श्री गजानन महाराज मंदिर, दुसरबिडयेथे होणार असून कार्यक्रमाचे आयोजक गजानन महाराज भक्त मंडळी यांच्या वतीने करण्यात आले आहे.परायणासाठी ग्रंथ, व्यासपीठ, आरती व भजन साहित्य आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.आयोजकांनी सोहळा सुरळीत पार पडण्यासाठी नियोजनबद्ध व्यवस्था केली आहे. ग्रामस्थ व भाविकांच्या सहभागामुळेदुसरबिडयेथे होणारा प्रकटदिन सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होणार असल्याचे चित्र पाहायला मिळणार.

You may have missed

error: Content is protected !!