सर्प दंशाने मृत महिलेच्या कुटुंबाला स्टेट बँक शाखेचा दोन लाखांचा धनादेश प्रदानप्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेचा मिळाला लाभ
लोणार (यासीन शेख) स्टेट बँक शाखा हिरडव मौजे पहुरयेथील महिला खातेदार सिंधुताई शंकर मुंढे यांचा काही महिण्यापूर्वी सर्पदंशामुळे मृत्यू झाला होता.सिंधूताई मुंढे ह्या महिला बचत गट सदस्य असल्याने हिरडव येथील स्टेट बँक शाखेत नियमित व्यवहार करत असत त्यावेळी त्यांनी प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेची अंतर्गत वार्षिक 20रु हप्ता भरून प्रधानमंत्रीसुरक्षा विमा योजना समजावून घेऊन आपला विमा काढून घेतला असल्यानेदुर्दैवाने सर्पदंशामुळे त्यांचा काही महिन्यापूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे भारतीय स्टेट बँक शाखा हिरडव शाखा व्यवस्थापक प्रसन्न गणेश झलके यांनी संबंधित घटनेची माहितीचा घेऊन व पाठपुरावा करून विमा दावा मंजूर करून यांनी मृतक महिला सिंधूताई शंकर मुंढे वारस त्याचे पती शंकर मुंढे यांना दि. 29 जानेवारी रोजी दोन लाख रु चा धनादेश त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी भारतीय स्टेट बँक शाखा हिरडव व्यवस्थापक प्रसन्न गणेश झलके,सहाय्यक प्रणव ठाकरे,चेतन रेखाते, श्रीकृष्ण ओव्हर,गौतम आठवले,ग्राहक सेवा केंद्र चालक योगेश डोळस स्टेट बँक शाखा हिरडवचे ग्राहक उपस्थित होते. Box प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनयेत 18 वर्ष ते 50 वर्ष वयोगटातील व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकतात ज्या बँकमध्ये आपले बचत खाते आहे त्यांनी आपले आधार प्रामाणिकरण करून लाईफ कव्हर दोन लाख रु 1 जून ते 31 मे या वर्षाच्या कालावधी साठी आहे सदर विमा धारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रु संबधित विमा धारकाच्या वारसास मिळतात यासाठी वार्षिक विमा हप्ता फक्त 20 रु. प्रति वर्ष आपल्या बचतखात्यातून कपात करण्यात येतात.या प्रधान मंत्री सुरक्षा योजनेत ग्राहकाने नोंदणी करून आपली सुरक्षा करावी असे आव्हान शाखा व्यवस्थापक प्रसन्न झलके यांनी केले आहे.
