जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल, दुसरबीड येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा

IMG-20260209-WA0037

सिंदखेडराजा( अनिल दराडे) दुसरबीड येथील जिजाऊ इंटरनॅशनल स्कूल येथे मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दुसरबीड चे केंद्रप्रमुख श्री. अशोकजी सवडे सर, श्री. संजयजी मातोंडकर सर ,(A.P.I.कि. राजा), श्री. सचिन मखमले (पो. पाटील पती दुसरबीड), डॉ. श्री. सुनीलजी कायंदे सर (उपाध्यक्ष बीजेपी ओबीसी मोर्चा), श्री. शिवराजजी कायंदे (सचिव भ.शि.प्र.मं. रूम्हना), शाळेच्या संचालिका डॉ. शिल्पा कायंदे मॅडम ,प्राध्यापिका धनश्रीताई कायंदे मॅडम हे उपस्थित होते. तसेच याप्रसंगी वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते माॅं सरस्वती, माॅं जिजाऊ , माॅं रमाई ,व संत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता व शाळेतील वार्षिक उपक्रमाच्या आढाव्याला उजाळा देऊन विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेबद्दल सौ. हिना शेख यांनी प्रेक्षकांना वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपक्रमांची प्रदर्शन दाखवली. तर डॉ. सुनीलजी कायंदे सरांनी आपल्या भाषणातून पालकांना विद्यार्थ्याविषयी जागृकता निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले. व विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनविण्याचे कार्य आपल्या शाळेकडून होत आहे. असा विश्वास पटवून दिला. तसेच शाळेच्या संचालिका डॉ. शिल्पा कायंदे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी आपले योगदान लक्षात घेता शाळेत होत असलेल्या शिक्षक – पालक सभेच्या वेळी शंभर टक्के उपस्थिती दर्शवावी व आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून काही गोष्टीसाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे असते. म्हणून शिक्षक- पालक चर्चा होणे महत्त्वाचे आहे असे म्हटले. तसेच पोलीस स्टेशन कि.राजाचे (A.P.I.) संजयजी मातोंडकर यांनी पालकांना आपल्या पाल्याच्या मोबाईल सारख्या सोशल मीडिया वापराबद्दल जागरूक व्हावे असे सांगितले. व सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक स्नेहसंमेलनाच्या होणाऱ्या कलाविष्कारांना शुभेच्छा दिल्या. तर वार्षिक स्नेहसंमेलन उत्सव मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या भारतीय संस्कृतीच्या आधारावर सर्व लोकगीतांचा समावेश करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारातून सर्व प्रेक्षकांचे मन जिंकले. नृत्यविष्कारामध्ये महाराष्ट्र संस्कृतीच्या सणाच्या नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तर यामध्ये श्री गणेश अर्चना, महादेवाचा तांडव ,नवरात्री उत्सव, शिवाजी महाराज जयंती ,भीम जयंती, ईद – मुबारक अशा विविध सणांचा उत्सव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शंभर टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ. प्रज्ञा बोरकर, कु. निकिता जायभाये , कु.गौरी देशमुख यांनी केले तर श्री उद्धव वाघ यांनी आभार मानले . तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य श्री. पी. एस. खार्डे सर, श्री प्रशांत उगलमुगले, सुभाष कायंदे, रामेश्वर भुसारे, सिद्धेश्वर शिंगणे, संदिप साळवे, शिवाजी बुधवत, धनंजय पऱ्हाड , अनुराधा मुर्तडकर, सुनिता म्हस्के, ज्योती घुगे, सविता उगलमुगले, छाया सांगळे, कल्याणी निंबाळकर ,शुभम चापाईतकर , अजहर शेख, सुनीता साळवे, सविता साळवे , मनोहर आंधळे ,शंकरभाऊ, शिवा ढवळे, शिवा साळवे, शुभम जायभाये ,अतुल सरकटे, सचिन वानखेडे आदींनी परिश्रम घेतले.

You may have missed

error: Content is protected !!