तहसीलदारांची ‘सिंघम’ स्टाईलने भूमी अभिलेख कार्यालयात धडक; साध्या वेशात केली कामाची पडताळणी !

Screenshot_2026-02-10-14-42-48-45_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेड राजा (अनिल दराडे): सरकारी कार्यालयातील ढिसाळ कारभार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारी नवी गोष्ट नाही. मात्र, सिंदखेड राजा येथे मंगळवार, ९ जुलै रोजी एक अत्यंत सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. तहसीलदार अजित दिवटे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला कोणतीही पूर्वसूचना न देता साध्या वेशात अचानक भेट दिली. एका जबाबदार अधिकाऱ्याने जमिनीवर उतरून घेतलेल्या या आढाव्याची सध्या संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.तहसीलदार अजित दिवटे यांनी आज सकाळी एखाद्या सामान्य नागरिकाप्रमाणे कार्यालयात प्रवेश केला. सुरुवातीला ते तहसीलदार आहेत हे कोणाच्याही लक्षात आले नाही. त्यांनी थेट तिथे कामासाठी आलेल्या शेतकरी बांधवांशी संवाद साधण्यास सुरुवात केली.

शेतकऱ्यांशी थेट संवादः

“तुमचे काम वेळेवर होते का?

“”कामानिमित्त कोणी पैशांची मागणी केली का?””

कर्मचाऱ्यांची वागणूक कशी आहे?

अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी कामाचा दर्जा तपासला. विशेष म्हणजे, उपस्थित शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर तहसीलदार दिवटे यांनी प्रत्येक कक्षात जाऊन कामकाजाची बारकाईने पाहणी केली. कार्यालयातील नीटनेटकेपणा, फाईल्सची मांडणी आणि कर्मचाऱ्यांची कामाप्रती असलेली शिस्त पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी भूमी अभिलेख विभागाचे प्रकाश शिंदे यांनी त्यांना विभागाच्या तांत्रिक कामकाजाची सविस्तर माहिती दिली.अचानक झालेल्या या तपासणीमुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. मात्र, तहसीलदारांनी कामाचे कौतुक केल्यावर कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. उत्तम काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे त्यांनी जाहीर कौतुक केले, ज्यामुळे प्रशासकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे.

You may have missed

error: Content is protected !!