बुलढाणा नगरपालिका हद्द वाढीला सागवन ग्रामस्थांचा तीव्र विरोध!

IMG-20260212-WA0055

बुलढाणा:-बुलढाणा शहरालगत असलेल्या सागवन गावात संभाव्य बुलढाणा नगरपालिका हद्द वाढीच्या निर्णयाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सागवन ग्रामस्थांची निष्पक्ष, निर्भीड बैठक पार पडली.या बैठकीत खालील विषय मांडून त्यावर चर्चा करण्यात आली.मौजे सागवन ग्रामपंचायत क्षेत्रात आणि जांभरुण गावाचा समावेश आहे असे आम्हाला समाज माध्यमे वृत्तपत्रे तसेच मा. उच्च न्यायालय नागपूर रिट याचिका क्रमांक ४७८९/२०२५ मधील दि. १९/०१/२०२६ चे निर्णयावरून समजले की, मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी हद्द वाढ संदर्भात प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे व त्यात मौजे सागवान जांभरूण चा सुद्धा समावेश आहे.जिल्हाधिकारी यांनी हद्दवाढ प्रस्तावांमध्ये आमचे ग्रामपंचायत सागवन जांभरून चा समावेश केला आहे तो पूर्णतः कायदा व नियमांचे उल्लंघन करणारा आहे.बुलढाणा नगर परिषदेचे हद्दवाढ करावी आणि त्यामध्ये आमचे गावाचा समावेश करावा अशी आमची जनतेची कोणती मागणी नव्हती व नाही.ग्रामपंचायत सागवन सर्वसाधारण सभा दिनांक २८/०७/२०२१ ठराव क्रमांक आठ अन्वये सागवन ग्रामपंचायत ला बुलढाणा नगरपरिषद हद्दवाढी मध्ये सामील करण्यात येऊ नये. गाव आणि जनतेच्या हितासाठी ग्रामपंचायत सागवनचे अस्तित्व स्वतंत्र ठेवावे असा ठराव घेतलेला आहे.तसेच मौजे सागवन ग्रामपंचायत येथील ग्रामसभा दिनांक २/१०/२०२१ रोजीचे ग्रामसभेमध्ये सुद्धा ग्रामपंचायतचे अस्तित्व स्वतंत्र ठेवण्यात यावे. ग्रामपंचायतला नगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात येऊ नये असा ठराव क्रमांक चार पारित केलेला आहे.नगरपरिषद बुलढाणा यांनी २९/१२/२०२० रोजी घेतलेल्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक ३४ हा नियमबाह्य असून कायद्याचे उल्लंघन करणारा आहे. नगरपरिषदला अशा प्रकारची स्वतःचे हद्दवाढ करून घेण्याचा कोणता अधिकार नाही.ग्रामपंचायत सागवनच्या जनतेने नगरपालिकेकडे कोणत्याही नागरिक सुविधांची मागणी केली नाही.ग्रामपंचायत सागवन ही गावातील जनतेस नागरी सुविधा देण्यास सक्षम आहे असे असताना, जिल्हाधिकारी आणि नगरपरिषदेने अगदी हुकूमशाही पद्धतीने नियमांची उल्लंघन करून सदरचा हद्दवाढ प्रस्ताव शासनास सादर केलेला आहे तो आम्हाला मान्य नाही सदरच्या प्रस्तावातून सागवन ग्रामपंचायत क्षेत्र वगळण्यात यावे.सागवन जांभरूण सोबतच सुंदरखेड, येळगाव, माळविहीर या गावांचा समावेश बुलढाणा नगरपालिकेमध्ये करावा असा प्रस्ताव बुलढाणा नगरपालिकेच्या वतीने शासन स्तरावर पाठविला आहे.सदर हद्द वाढ प्रस्तावाचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे आणि आता तो अंतिम टप्प्यात येताना दिसत आहे परंतु या सर्व प्रक्रियेमध्ये ग्रामस्थांची भावना ग्रामस्थांची भूमिका कधीही जाणून घेण्यात आली नाही.आणि तशी कुठलीही इच्छा सागवन ग्रामस्थांची बुलढाणा नगरपालिकेमध्ये जाण्याची नाही.त्यामुळे जर असं काही होत असेल तर ते खूप अन्यायकारक होईल.येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या आपले स्वतंत्र गाव म्हणून असलेली सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, प्रशासनिक ओळख पुसण्यासाठी कारणीभूत ठरेल सर्वसामान्य जनतेला नाहक शहरी अतिरिक्त करांचा बोजा सहन करावा लागेल.सागवन गावाच्या वाट्याला सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, प्रशासनिक गुलामगिरी आणण्याचा जो घाट घातला जातोय त्याचा तीव्र निषेध सर्व गावकऱ्यांनी व्यक्त केला.आमचं सार्वभौमत्व, आमचे स्वातंत्र्य, आमची सागवन गाव म्हणून असलेली ओळख हे पूर्वीपासून स्वतंत्र आहे आणि ती स्वतंत्रच राहीली पाहिजे यावर सर्व गावकऱ्यांनी भर दिला.तसेच सागवन गावाची पूर्वापार असलेली कायम ठेवून नगरपालिकेमध्ये समाविष्ट करू नये अशी विनंती प्रशासनाला करण्यात येणार आहे यासंबंधी विविध स्तरावर गावकऱ्यांच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील असं ठरविण्यात आले.तसेच याबाबतीत सागवन बचाव कृती समिती स्थापन करून गावाला नगरपालिकेत जाण्यापासून वाचवण्यासाठी संघर्ष करण्याचे एकमताने ठरले.नगरपालिकेमध्ये जायचं की नाही जायचं हा सर्वस्वी गावाचा अधिकार असताना ग्रामसभेला कुठल्याही प्रकारे विश्वसात न घेता परस्पर नगरपालिकेने हा ठराव का पाठविला याचा सुद्धा जाब ग्रामस्थ आता विचारत आहेत.भविष्यात असा जर कुठला तुगलकी निर्णय शासनाने जाहीर केला तर त्यावेळी त्या विरोधात प्रचंड असंतोष उपळल्याशिवाय राहणार नाही अशा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिला.गावाच्या सार्वभौमत्वाच्या स्वाभिमानाच्या अस्मितेसाठी आमचा लढा शेवटच्या श्वासापर्यंत त्या ठिकाणी कायम राहील असा निर्धारही या ठिकाणी गावकऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी गावातील नागरिक, महिला बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत सागवन गावाच्या अस्मितेच्या प्रश्नावर विचार मंथन करण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये आपापले मत व्यक्त केले.

You may have missed

error: Content is protected !!