बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई; शेगाव येथील घरफोडी प्रकरणातील ३ कुख्यात गुन्हेगार जेरबंद
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शेगाव शहरात झालेल्या मोठ्या घरफोडीचा छडा लावत ३ अट्टल गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सोने, मोबाईल आणि एक हुंदाई कार असा एकूण ६ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अकोला जिल्ह्यातील दोन गुन्ह्यांचीही उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.शेगाव येथील रहिवासी धीरजकुमार रामपाल सिंह यांच्या घरात ५ ते ८ फेब्रुवारी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून प्रवेश केला होता. चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि घराबाहेर उभी असलेली हुंदाई कार (क्रमांकः MH-49-CS-4956) लंपास केली होती. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्यापोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे जालना जिल्ह्यातील परतूर आणि मंठा येथून ३ आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध जिल्ह्यांत अनेक गुन्हे दाखल आहेतःराजेंद्र बाबासाहेब राऊत (२५, रा. परतूर): १७ गुन्हे दाखल (घरफोडी व चेन स्नॅचिंग).राजेश शंकर शर्मा (३०, रा. मनमाड): २७ गुन्हे दाखल (दरोडा, चोरी, जबरी चोरी).थश्रीराम सोमनाथ सोनवणे (२०, रा. वैजापूर): ८ गुन्हे दाखल (मोटार सायकल चोरी)या आरोपींनी केवळ शेगावच नव्हे, तर अकोला जिल्ह्यातील डाबकी रोड आणि खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत केलेल्या २ घरफोड्यांचीही कबुली दिली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत (PCR) असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
