श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या रा. से. यो. श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन संपन्न

IMG-20260213-WA0026

सिदखेडराजा (अनिल दराडे ) देशपातळीवर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक दायित्व, नवचेतना स्वप्रेरीत अनुशासन व श्रमाप्रती सन्मानाचीभावना तयार करण्याचे काम रासेयो करीत असते तसेच युवकांना जीवन जगण्याची कला शिकविते, असे प्रतिपादन उद्घाटक वाणिज्य विभागप्रमुख डॉ. नरेंद्र शेगोकार यांनी केले. श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या दि. ११ ते १८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या रासेयो सातदिवसीय श्रमसंस्कार शिबिराच्या उदघाटन प्रसंगी दत्तकग्राम गिरोली बुद्रुक येथे ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अनंत आवटी, प्रमुख अतिथी गिरोलीचे सरपंच संजय कव्हळे, माजी सरपंच परमेश्वर कव्हळे, ग्रामसचिव बाळकृष्ण तिडके, रामेश्वर नागरे, नजिममुद्दीन शेख यांची उपस्थिती होती. अध्यक्षीय भाषणात डॉ. अनंत आवटी यांनी युवकांना रासेयो च्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचे आवाहन केले.उद्घाटनानंतर दुसऱ्या सत्रात अंधश्रद्धा निर्मूलन हा कार्यक्रम पार पडला. यासाठी प्रमुख वक्ते म्हणून शाहीर श्रीराम कोरडे ह्यांनी पोवाडे, भारूड, ओव्या या माध्यमातून प्रबोधन केले. या सत्रासाठी डॉ. उमेश देशमुख हे अध्यक्ष व डॉ. किरण मोगरकर हे अतिथी म्हणून उपस्थित होते.या शिबिर उद्घाटन समारोहाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. रामेश्वर माने यांनी तर सूत्रसंचालन डॉ. ज्योती ढोकले ह्यांनी केले. अतिथी परिचय सहकार्यक्रम अधिकारी डॉ. दिक्षापुत्र बिऱ्हाडे ह्यांनी करून दिला व आभार डॉ. अमोल जाधव ह्यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंसेवक, स्वयंसेविका व गावकरी उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे सर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.या शिबिरादरम्यान पुढील सात दिवसात हिमोग्लोबिन तपासणी, शेती विषयक ज्ञान, महिला सबलीकरण, कवी संमेलन, गीत गायन, संविधान जागर, पर्यावरण संवर्धन इत्यादी उपक्रमांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.

You may have missed

error: Content is protected !!