डोंगर शेवलीच्या माजी सरपंचांनी ‘काबा’मध्ये मागितली गावासाठी दुवा; हज यात्रेहून परतताच शेख सरदार नानांचा भव्य सत्कार
डोंगर शेवली ( गजानन दसरकर)चिखली तालुक्यातील डोंगर शेवली येथील लोकमान्य व्यक्तिमत्व आणि माजी सरपंच शेख सरदार भाई (उर्फ नाना) यांनी आपली पवित्र हज यात्रा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. सुमारे २० दिवस मक्का-मदिना येथे वास्तव्यास राहून गावी परतल्यानंतर, ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, या पवित्र प्रवासात त्यांनी आपल्या गावाच्या सुख-समृद्धीसाठी विशेष प्रार्थना (दुवा) केली.शेख सरदार नाना हे १७ जानेवारी २०२६ रोजी हज यात्रेसाठी रवाना झाले होते. त्यांच्या या धार्मिक प्रवासाला बुलढाणा मतदारसंघाचे माजी आमदार ध्रुपतराव सावळे आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या होत्या. राजकीय आणि सामाजिक स्तरावरील या शुभेच्छांची चर्चा त्यावेळी तालुक्यात रंगली होती.हज यात्रेदरम्यान सरदार नाना यांनी काबा शरीफ येथे २० दिवस वास्तव्य केले. या पवित्र ठिकाणी त्यांनी केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर संपूर्ण डोंगर शेवली गाव सुखी, समाधानी आणि समृद्ध व्हावे, यासाठी ईश्वराकडे साकडे घातले. त्यांच्या या कृतज्ञतेबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.७ फेब्रुवारी रोजी नानांचे गावात आगमन होताच, उत्साही वातावरणात त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी उपसरपंच शेख फाईम भाई, शेख जाकीर भाई आणि पत्रकार गजानन दसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नानांना शाल आणि हार अर्पण करून सन्मानित करण्यात आले.या सोहळ्याला शेख जागीर ठेकेदार, लतीफ पठाण, शेख युनूस, मुक्तार बाबा, शेख कलीम, शेख सोहेल, मुक्तार बेग, शेख इमरान, अफरोज पठाण, शेख रविश यांसह गावातील मोठ्या संख्येने प्रतिष्ठित नागरिक आणि तरुण उपस्थित होते.
