लोणार तालुक्यातील jio ग्राहक त्रस्त ; नेटवर्क डाऊन दैनंदिन आर्थिक व्यवहार विस्कळीत…..

unnamed-2_1609847908

लोणार (यासीन शेख) तालुक्यात तब्बल तीन दिवसांपासून जिओचे मोबाईल नेटवर्क ठप्प झाल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. संपर्क तुटल्याने आर्थिक व्यवहारही रखडले आहेत. या गंभीर समस्येकडे संबंधित कंपनीकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे संतापाची लाट उसळली आहे.तालुक्यातील मोठ्या प्रमाणात गावामध्ये जिओने नेटवर्क विस्तार करत सर्वत्र आपले साम्राज्य प्रस्तापित करत ग्राहकांना आकर्षित केले होते. ग्रामीण भागात लाखो उपभोगता आजही जिओ सेवांवर अवलंबून आहेत. मात्र सलग तीन दिवस सेवा बंद राहिल्याने संपर्क साधणे अशक्य झाले आहे. डिजिटल व्यवहारांवर आधारित किराणा, हॉटेल, कपडा बाजारासह अनेक व्यावसायिकांचे व्यवहार ठप्प पडले असून नागरिकांना बँकेतून रोख रक्कम काढून व्यवहार करावे लागत आहेत.विशेष म्हणजे, इतका कालावधी उलटूनही सेवा पूर्ववत करण्यासाठी ठोस पावले उचलली गेल्याचे दिसत नाही. कंपनीकडून केवळ “तक्रार नोंदवली आहे, लवकरच निराकरण होईल” अशी औपचारिक उत्तरे दिली जात असल्याने ग्राहकांचा संताप अधिकच वाढला आहे. परिणामी अनेकांनी क्रमांक कायम ठेवत इतर कंपन्यांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, नेटवर्क ठप्प होण्यामागे नेमके कारण काय, याचा अधिकृत खुलासा करण्याची मागणी जोर धरत आहे. अन्यथा ग्राहकांचा विश्वास पूर्णपणे ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ग्राहकांचे इतर कंपनीकडे वळण्यास सुरुवात सलग तीन दिवसापासून नेटवर्क डाऊन असल्याकारणाने ग्राहकांनी आपले नंबर पोर्ट करण्यास सुरुवात केली असून इतर कंपन्यांच्या सिम विक्रेत्याकडे गर्दी पहावयास मिळत आहे तर बऱ्याच लोकांच्या व्हाट्सअप स्टेटस वर सध्या माय न्यू नंबर असे स्टेटस पहावयास मिळत आहे.

You may have missed

error: Content is protected !!