साकेगाव येथे महाशिवरात्रीचा जल्लोष: ऐतिहासिक हेमाडपंती मंदिरात भाविकांची मांदियाळी, तरुणाईचा ‘भक्ती अन् शक्ती’चा संगम….​

IMG-20260216-WA0030

साकेगाव( एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी )ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साकेगाव येथील प्राचीन हेमाडपंती महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा झाला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने आणि तरुणाईच्या अभूतपूर्व उत्साहाने संपूर्ण साकेगाव परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.साकेगावचे हे पुरातन महादेव मंदिर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर काल (दि. १५) पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्रावण महिन्यातील सोमवार असो वा महाशिवरात्र, या ऐतिहासिक स्थळाचे महत्त्व अधोरेखित करणारा जनसागर येथे पाहायला मिळतो.​यंदाच्या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे साकेगाव, खोर, माळशेंबा, अंत्रीकोळी, वाघापूर आणि गोद्री या सहा गावांतील तरुणांनी एकत्र येत केलेले नियोजन. केवळ धार्मिक विधीच नव्हे, तर सामाजिक जबाबदारी म्हणून तरुणांनी परिसरात आलेल्या भाविकांसाठी फराळ वाटपाचे आयोजन केले होते.यात्रेची सांगता आज दि. १६/०२/२०२६ रोजी मोठ्या उत्साहात होत आहे. दुपारी १२:३० ते ३:३० या वेळेत भव्य महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेल्या या प्रसादाचा लाभ पंचक्रोशीतील हजारो भाविक घेत आहेत.​”साकेगावच्या या यात्रेने केवळ धार्मिक परंपराच जपली नाही, तर सामूहिक ऐक्याची आणि तरुणांच्या संघटनशक्तीची एक नवी झलक समाजासमोर सादर केली आहे.”— हेमाडपंती महादेव मंदिर भक्त मंडळ, साकेगाव.

You may have missed

error: Content is protected !!