पाणी फाउंडेशन आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान?
जयजित आङे

लोणार:- तालुका महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवोन्नती अभियान ( महिला बचत गट )यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रात ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ आणि ‘शेतकरी कप’ (फार्मर कप) सारख्या स्पर्धांद्वारे दुष्काळमुक्त आणि समृद्ध ग्रामीण महाराष्ट्रासाठी लोकसहभागातून जलसंधारण व शाश्वत शेतीचे काम केले जाते.ही स्पर्धा ४५ दिवसांच्या कालावधीत ग्रामीण भागात पाणी साठवण क्षमता वाढवण्यास प्रोत्साहन देते असते.महाराष्ट्र ग्रामीण जिवोन्नती अभियान (उमेद) कार्यकर्त्यांना ‘गट निमंत्रक’ किंवा ‘मेंटर’ म्हणून प्रशिक्षित करून ‘शेतकरी कप’ मध्ये सहभागी करून घेतले जाते, ज्यामुळे महिला बचत गटाचा सहभाग वाढतो आणि गटशेतीला बळ मिळते असे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावांना अनुक्रमे ७५ लाख, ५० लाख आणि ४० लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली जातात पाणी फाउंडेशन मार्फत लोणार तालुक्यांमधील उमेद अभियानातील (सी.आर.पी ) ग्रामसखी तसेच कृषी विभागामार्फत प्रगतशील शेतकरी यांना दि १६ / ०२ / २०२६ ते १८ / ०२ / २०२६ तीन दिवसीय मोफत तांत्रिक प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र (खरपुडी )जालना येथे देण्यात येणार आहे त्याकरीता पहिली प्रशिक्षणाचे तुकडी आज पंचायत समिती लोणार येथून रवाना झाली आहे.सदरील तुकडीला हिरवी झंडी दाखवण्यासाठी लोणार पंचायत समितीचे प्रशासकीय अधिकारी श्री. रविभाऊ मापरी साहेब,विस्तार अधिकारी पंचायत समिती लोणार श्री. मुंढे साहेब,तालुका कृषी अधिकारी श्री. शिरोदे साहेब , उमेद अभियानातील तालुका व्यवस्थापक श्री संदीप तिडके , सौ.सुनंदा करडेल म्याडम , प्रभाग समन्वयक योगेश रत्नपारखी, कपिल इंगळे ,अक्षय उंद्रे उपस्थित होते
