मक्काचे दाणे भरलेच नाही;कृषी विभागात दाखवली कणसं शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांचा कृषी विभागात ठिय्या…नुकसान भरपाई देण्यासह कंपनीवर कारवाई करा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे मागणी……

IMG-20260224-WA0013

निलेश कोल्हे

चिखली — एकलारा येथील अंदाजे २० ते २५ शेतकऱ्यांनी एका नामांकित बायर कंपनीकडून मक्का बियाणे घेतले होते.याबाबतचा करार देखील कंपनी सोबत करण्यात आला होता.मात्र दाणे भरण्याचा कालावधी उलटून देखील मक्काचे दाणेच भरत नसल्याचे समोर आल्याने शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती कंपनीचे प्रतिनिधी यांना दिली मात्र उडवाउडवीचे उत्तरे मिळत असल्याने अखेर शेतकऱ्यांनी सदरील माहिती क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांना दिल्याने दि२३ फेब्रुवारी रोजी एकलारा येथील शेतकऱ्यांसह सरनाईक यांनी कृषी विभाग गाठुन त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे जिल्हा समितीच्या माध्यमातून पंचनामे करण्यात यावे,व कराराप्रमाणे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुका कृषी विभागाकडे केली आहे.या प्रकरणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री डाबरे यांच्याशी सुद्धा सरनाईक यांनी भ्रमणध्वनी व्दारे चर्चा केली.नूकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांसह विनायक सरनाईक यांनी दिला आहे.यावेळी बंडु आंभोरे,मधुकर आंभोरे, मधुकर तोंडे,पांडुरंग झगरे,संजय आंभोरे,शंकर आंभोरे,विश्वानाथ आंभोरे,विजय झगरे,माधव गोल्डे,विष्णु आंभोरे,भुजंगराव गोल्डे,उध्दव आंभोरे,आंबादास आंभोरे,अनिल झगरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होतेनुकसान भरपाई देण्यासह त्या कंपनीवर कारवाई करा अन्यथा शेतकऱ्यांसह आंदोलन छेडणार – विनायक_सरनाईकशेतकऱ्यांनी मक्का पिक घेतलं पिकाला जपण्याचं काम केलं मोठा खर्च शेतकऱ्यांनी केला मात्र तिन साडेतीन महिणे उलटून जर मक्काचे कणसं भरत नसेल तर हि शेतकऱ्यांचं नूकसान करणारी बाब असून नामंकीत कंपनीच जर शेतकऱ्यांची फसवणूक करण्यास कारणीभूत ठरत असेल तर या कंपनीवर कारवाई करण्यात यावी,जिल्हा समितीच्या माध्यमातून पंचनामे करण्यात यावे व शेतकऱ्यांना कराराप्रमाणे तातडीने नूकसान भरपाई देण्यात यावी, फसवणूक प्रकरणी कंपनीवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात यावे मागण्यांची पूर्तता होवून न्याय न मिळाल्यास शेतकऱ्यांसह आंदोलन छेडू असा इशारा सरनाईक यांनी दिला आहे

You may have missed

error: Content is protected !!