विनोबा ॲप मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिक्षिका स्नेहल सरकटे सन्मानित ।
बुलढाणा( सचिन खंडारे ) जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करार अंतर्गत राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. जानेवारी महिन्यात बुलढाणा जिल्हयातील मोताळा तालुका स्तरावरील ‘पोस्ट ऑफ द मंथ’ विजेते शिक्षिका कु. स्नेहल सरकटे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 1 मोताळा) यांना दि २६ फेब्रुवारी रोजी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सदरील पुरस्कार मोताळा तालुका गटशिक्षणाधिकारी अधिकारी डी. पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी जवरे केंद्रप्रमुख व समग्र शिक्षा मोताळा येथील अधिकारी व कर्मचारी गण तथा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम चे (वरिष्ठ जिल्हा समन्वयक) शेख नजीरयावेळी उपस्थित होते ‘यावेळी शिक्षिका स्नेहल सरकटे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातुन अभिनंदनचा वर्षाव होत आहे .स्नेहल सरकटे यांना या अगोदरही उत्कृष्ट सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव देवून गौरविण्यात आले होते विशेष .
