मेहकर उपविभागाची POSB नेट खात्यांत १००.५५% उद्दिष्टपूर्ती; एसडीआय (पी) गजानन बी. काळे यांचे यशस्वी नेतृत्व…..

IMG-20260227-WA0002

प्रतिनिधी : रवि ढवळे

मेहकर:- उपविभागाने आर्थिक वर्ष २०२५–२६ मध्ये POSB नेट खात्यांच्या वाढीचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण करत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. मेहकर उपविभागाचे एसडीआय (पी) गजानन बी. काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पथकाने संघभावनेने काम करत १०० टक्क्यांहून अधिक उद्दिष्ट साध्य केले आहे. निर्धारित ३५,५५० खात्यांच्या उद्दिष्टाच्या तुलनेत एकूण ३५,७४६ नवीन नेट खाती उघडण्यात आली असून १००.५५ टक्के उद्दिष्टपूर्ती साध्य झाली आहे. या यशामध्ये कार्यालय सहाय्यक (OA), मेल ओव्हरसीअर्स, सर्व एसपीएम, पीए, पोस्टमन, एमटीएस, बीपीएम व एबीपीएम यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. ग्राहकांशी सातत्यपूर्ण संपर्क, प्रभावी जनजागृती उपक्रम आणि काटेकोर नियोजनामुळे ही कामगिरी शक्य झाल्याचे सांगण्यात येत असून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मेहकर उपविभागीय व बुलढाणा अधीक्षक डाक साहेब यांच्याकडून कौतुक होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!