सुलतानपूर येथील डॉ.आर् एन लाहोटी नर्सिंग कॉलेज चा उत्कृष्ट निकाल मुलीं मधून कु रागिनी शत्रुघ्न चव्हाण प्रथम….

Screenshot_2026-02-27-07-08-42-32_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

प्रतिनिधी:- जयजीत आडे

बिबी:- डॉक्टर आर् एन लाहोटी नर्सिंग कॉलेज सुलतानपूर चा याही वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम असताना हत्ता ता. लोणार येथील कु.रागिनी शत्रुघ्न चव्हाण या गरीब कुटुंबातील घरची परिस्थिती हालाकीची, बेताचीच असताना सुद्धा अभ्यासाच्या व बुद्धिमत्तेच्या जोरावर डॉ. आर.एन. लाहोटी नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षी प्रथम क्रमांक -द्वितीय वर्षी द्वितीय क्रमांक – तृतीय वर्ष प्रथम क्रमांक 500 पैकी 405 मार्क घेऊन पूर्ण विभागात मुलींमधून प्रथम क्रमांक घेण्याचा बहूमान मिळाला आहे. कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ.लाहोटी यांच्या हस्ते रागिणीचा सत्कार करण्यात आला रागिनी च्या वडिलांची परिस्थिती हालकीचीआणि बेताची असताना सुद्धा रागिणीने जिद्दीने चिकाटीने मेहनतीने अभ्यास करून आई वडिलांचे गावाचे शाळेचे व स्वतःचे नाव रोशन केले तसेच अभयदादा चव्हाण (माजी समाज कल्याण सभापती जि.प. बुलढाणा )यांनी सुद्धा त्यांना वेळोवेळी सहकार्य केले रोज हत्ता ते सुलतानपूर असा प्रवास करून शिक्षण पूर्ण केले वडिलांनी सुद्धा आपल्या लेकीला शैक्षणिक साहित्याची कुठल्याही प्रकारची कमतरता पडू देता सतत मार्गदर्शन करत राहिले मुलीने सुद्धा वडिलांचे नाव मोठे करून दाखविले या यशाचे श्रेय आई वडील शिक्षक यांना दिले आहे परिसरामध्येरागिणी सारखा पंक्रोशीतील मुलींनी जिद्द चिकाटीने, मेहनतीने अभ्यास करून आई वडिलांचे नाव उज्वल करून आदर्श निर्माण करावा रागिणीचे परिसरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे

You may have missed

error: Content is protected !!