प्रशासन जनतेच्या दारी ! चिखली तालुक्यात ११ महसूल मंडळांमध्ये ‘समाधान शिबिरांचे’ आयोजनमार्च ते मे दरम्यान रंगणार ‘महाराजस्व अभियान’; तहसीलदार विजय सवडे यांचे नागरिकांना आवाहन

demo (3)

चिखली (एकनाथ माळेकर):सर्वसामान्यांचे प्रश्न स्थानिक पातळीवर सुटावेत आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली मिळावा, या उद्देशाने चिखली तहसील कार्यालयाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ आयोजन करण्यात आले आहे. मार्च महिन्यापासून ते मे महिन्यापर्यंत तालुक्यातील एकूण ११ महसूल मंडळांमध्ये ही शिबिरे पार पडणार असून, याद्वारे प्रशासकीय यंत्रणा थेट नागरिकांच्या दारात पोहोचणार आहे.चिखली तहसीलदारांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ७मार्च रोजी हातनी, ८ मार्च रोजी अमडापूर, १४ मार्च रोजी उदयनगर व चांधई, १० एप्रिल रोजी धोडप व मेरा खुर्द, १७एप्रिल रोजी पेठ व शेळगाव आटोळ, ८ मे रोजी चिखली आणि १५ मे रोजी एकलारा व कोलारा महसूल मंडळांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत.एकाच छताखाली मिळणार ‘या’ सेवाःया शिबिरांमध्ये प्रामुख्याने शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर भर दिला जाणार आहे. यामध्येःमहसूल विषयक कामे: प्रलंबित फेरफार निकाली काढणे, डिजिटल ७/१२ व ८-अ उताऱ्यांचे वितरण, ई-मोजणी आणि Agristack सेवा.दाखल्यांचे वाटपः उत्पन्न, रहिवासी, जात आणि नॉन-क्रिमीलेअर यांसारखी महत्त्वाची प्रमाणपत्रे जागेवरच वितरित केली जातील.तांत्रिक व शेतीविषयकः पी.एम. किसान योजना, अकृषक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शन आणि भूसंपादनानंतर गाव दप्तर अद्ययावत करणे.तक्रार निवारणः ‘सिंगल विंडो क्लिअरन्स’ प्रणालीद्वारे नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण केले जाणार आहे.तहसीलदारांचे आवाहनःया उपक्रमाबाबत माहिती देताना तहसीलदार श्री. विजय सवडे म्हणाले की, “तालुक्यातील शेतकरी, नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांनी आपल्या महसूल विषयक कामांसाठी संबंधित कागदपत्रांसह निर्धारित दिवशी शिबिरास उपस्थित राहावे. महसूल विभागाशी संबंधित कामे प्रलंबित असल्यास या संधीचा लाभ घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे.”या समाधान शिबिरामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचणार असून, शासकीय कामांमधील पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!