भिमाई महिला बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने बिबी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते कर्तबगार महिलांचा सन्मान
बिबी ( जयजित आङे )दि. ८ मार्च रोजी बिबी येथील भिमाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पंचक्रोशीतील विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देणाऱ्या कर्तबगार महिलांचा आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.बीबी येथे आयोजित या कार्यक्रमाला लोणार–मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नंदाताई कायंदे, माजी जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती अभय दादा चव्हाण, माजी पंचायत समिती सभापती राम भालेराव, लोकजागराचे विश्वस्त प्रवीण भाऊ गीते प्रा अरविंद चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष, विठ्ठल भाऊ आटोळे माजी सरपंच तुळशीराम करपे मामा दिलीप भाऊ बनकर , विठ्ठल चव्हाण पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे भाई भिकाजी इंगळे , ठाणेदार चंद्रकांत पाटील भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष सिताराम इंगळे सुदाम इंगळे, ज्येष्ठ कवी-गायक सूर्यभान हिवाळे, सामाजिक कार्यकर्ते शाबू शेठ, शेख जाकिरभाई, अनिस भाई तसेच पत्रकार भगवान साळवे, रमेश खंडागळे, कृष्णा पंधे, सुधाकर डोंगरदिवे, मधुकर इंगळे, पारस इंगळे, मनोहर साळवे, साहेबराव वाकळे, रवी इंगळे, विकास वाकोडे, सोनू निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात सरपंच श्रीमती . चंदाताई गुलमोहर, सौ. संचिता चंडालिया, सौ. सुनीता भांड, लताबाई घाईत, डॉ. राजश्री वाघ मॅडम यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी व माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.यावेळी सुलतानपूर येथील डॉ. आर. एन. लाहोटी नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी कु. रागिणी शत्रुघन चव्हाण (रा. हत्ता, ता. लोणार) हिने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिचा भिमाई महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे विशेष सत्कार करण्यात आला.तसेच शेरे मॅडम, दंदाले (तलाठी) मॅडम, दानवे मॅडम, शिला हिवाळे, रेखा वाघ, भाग्यश्री पंधे, रुक्मिणी शिंदे, पल्लवी आंधळे, भारती इंगळे, भारती काकडे, अनिताताई भांड, सविताताई आटोळे, इंदुबाई साळवे तसेच ग्रामीण रुग्णालयातील नर्स, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासह अनेक महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, झाशीची राणी, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे, माता रमाई, मदर तेरेसा, कल्पना चावला, गोरी लंकेश, सिंधुताई सपकाळ यांसारख्या महान महिलांच्या जीवनकार्यावर प्रकाश प्रकाश टाकत महिलांनी आत्मनिर्भर बनावे असे आवाहन केलं पत्रकार ब्रह्मानंद वाकोडे यांनी. भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी भिमाई बहुउद्देशी संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी पदाधिकारी यांनी केला
