चिखलीत वंचित अन् भाजपला मोठे खिंडार; डझनभर पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!​खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर दाखवला विश्वास; रवींद्र काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षप्रवेश​

IMG-20260315-WA0045

चिखली/मेहकर ( एकनाथ माळेकर ):चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या विकासकामांवर विश्वास ठेवून आणि शिवसेना नेते रवींद्र काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली येथील वंचित बहुजन आघाडी व भाजपच्या अनेक बड्या पदाधिकाऱ्यांनी आज अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. मेहकर येथे हा सोहळा उत्साहात पार पडला.​वंचित आणि भाजपचे ‘हे’ शिलेदार आता शिवसेनेत:​या पक्षप्रवेशामुळे चिखलीत शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. प्रवेश करणाऱ्यांमध्ये खालील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे:​अर्जुन हरिभाऊ बोर्डे (माजी तालुकाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)​विजय वामनराव खरात (माजी उपाध्यक्ष, चिखली शहर भाजप)​अनिल सुभाष लहाने (माजी उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी)​संदीप देवदास साबळे (शाखाप्रमुख, वरखेड – वंचित बहुजन आघाडी)​विद्यासागर भगवान जाधव (संघटक, वंचित बहुजन आघाडी)​यावेळी बोलताना नवीन प्रवेशित कार्यकर्त्यांनी सांगितले की, “खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यात केलेल्या विकासकामांचा धडाका आणि शिवसेना नेते रवींद्र काकडे यांचे खंबीर संघटन कौशल्य पाहून आम्ही शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे शिवसेनेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य अधिक जोमाने करू.”​या पक्षप्रवेशामुळे चिखली मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी आणि भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेली ही मोठी मोर्चेबांधणी असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

You may have missed

error: Content is protected !!