किनगाव राजा पोलिस स्टेशन च्या वतीने इतर पार्टी उत्साहात साजरी
सिंदखेडराजा (अनिल दराडे) किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त दुसरबीड येथे दादामिया दर्गा मज्जिद मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या अवसरावर मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याच्या उपास सोडण्यात आले.इफ्तार पार्टीमध्ये गावातील मुस्लिम बांधव, उपवास ठेवणारी मंडळी, सर्व धर्माचे लोक प्रतिनिधी, सर्वपक्षीय नेते मंडळी, पत्रकार, किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय मातोंडकर व सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.या अवसरावर बोलताना ठाणेदार संजय मातोंडकर म्हणाले की, “रमजान महिना हा मुस्लिम समाजाचा पवित्र महिना आहे. या महिन्यातील इफ्तार पार्टीमध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र आले आहेत, हे अत्यंत आनंदाचे आहे. पोलीस विभाग सर्व धर्माचे लोकांच्या साथीने काम करत आहे.”इफ्तार पार्टीमध्ये उपस्थित असलेल्या गावातील मुस्लिम बांधवांनी पोलीस विभागाचे आभार मानले आणि सर्व धर्माचे लोकांच्या साथीने रमजान महिना साजरा करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
