छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांना जीवदान; जनतेच्या प्रार्थना आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश…
सिंदखेड राजा( अनिल दराडे)छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांना झालेल्या भीषण अपघातानंतर अखेर उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळत ते सुखरूप घरी परतले आहेत. त्यांच्या प्रकृतीत झालेली सुधारणा ही जनतेच्या प्रार्थना, डॉक्टरांचे अथक प्रयत्न आणि सर्व स्तरांतून मिळालेल्या पाठिंब्याचे फलित मानले जात आहे.दि. १ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नियोजन समितीच्या बैठकीसाठी जात असताना अज्ञात वाहनाने धडक देत पसार झाल्याने हा अपघात घडला असे त्यांच्या नातेवाईकांनी म्हटले आहे . त्यानंतर बाबासाहेब पुरंदरे आणि आणि गावातील तरुणांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.उपचारादरम्यान अनेक मान्यवरांनी रुग्णालयात भेट देत कुटुंबियांना धीर दिला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, आमदार अर्जुन खोतकर, छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, शिवसेना नेते विष्णू भाऊ पाचफूले, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, मराठा क्रांती मोर्चाचे महेश डोंगरे, तसेच अँड. नाझरे काझी छावा संघटनेचे पदाधिकारी यांच्या सह विविध सामाजिक कार्यकर्ते व व 8विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी सद्भावना व्यक्त केली.कलावती रुग्णालयाचे संचालक डॉ. कृष्णा कोरडे यांच्या सूचने नुसार रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विशेष वैद्यकीय पथक नेमण्यात आले होते. डॉ. पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी उत्कृष्ट उपचार करून अशोक राजे जाधव यांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले.अशोक राजे जाधव यांनी रुग्णालयात उत्कृष्ट औषधोपचार केल्यामुळे डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.या संपूर्ण काळात सर्वधर्मीयांनी दाखवलेला बंधुभाव विशेष उल्लेखनीय ठरला. मुस्लिम समाजातील सादिक सैय्यद (जालना) यांनी पवित्र रमजान महिन्यात त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. विविध समाजघटकांतील नागरिकांनीही देवाकडे प्रार्थना करून त्यांच्या आरोग्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.अशोक राजे जाधव यांनी घरी परतल्यानंतर भावना व्यक्त करताना सांगितले की, “जनतेच्या आशीर्वादामुळे आणि पुण्याईमुळे मला नवजीवन मिळाले. येणारे आयुष्य मी जनसामान्य, शेतकरी आणि समाजाच्या सेवेसाठी समर्पित करणार आहे.”या घटनेतून जाधव यांचे जनसामान्यांशी असलेले नाते आणि समाजातील सर्व स्तरांत असलेला त्यांचा प्रभाव अधोरेखित झाला आहे.
