श्री बालाजी संस्थान कार्यालयात सरस्वती पूजन संपन्न

IMG-20260320-WA0006

सिंदखेडराजा (अनिल दराडे) दि.१९ मार्च रोजी गुढी पाडव्याच्या दिवशी मुहुर्ताप्रमाणे सकाळी ९:३० वाजता श्री बालाजी संस्थान कार्यालयात सरस्वती पूजन झाले. वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव, धर्माधिकारी श्री टाकळकर व व्यवस्थापक श्री बीडकर यांच्या हस्ते संस्थानचे खातेबुक व पंचांगाचे विधीवत पूजन होऊन आरती झाली. त्यानंतर ब्रम्हवृंदांनी पंचांग वाचन केले. तसेच चैत्र शु.१ रोजी सुरू होणारे नववर्ष शालिवाहन शके १९४८ सर्व जनतेस सुखसमाधानाचे जावो, अशी श्री बालाजी चरणी प्रार्थना करण्यात आली. या कार्यक्रमास राजउपाध्ये, देवउपाध्ये, क्षेत्रउपाध्ये, त्रैशाखीय ब्राह्मणवृंद तसेच संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!