शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा….
बुलढाणा:- शासकिय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा येथे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त दिनाक 24 मार्च रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमारिता डॉ. वर्षा गुट्टे, जिल्हा क्षयरोग अधिकारी बुलढाणा या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. प्रास्ताविकात सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. कैलास वाघ यांनी क्षयरोगाबाबत वैद्यकीय माहिती सोप्या भाषेत समजावून सांगितली. डॉ. वर्षा गुट्टे यांनी क्षयरोगाची सद्यस्थिती व उपाययोजना बाबत माहिती दिली. अध्यक्षिय भाषणात महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने यांनी वैद्यकीय महाविद्यालय व क्षयरोगावरील उपचार यांचा संबंध तसेच संशोधन याबाबत विचार व्यक्त केले. डॉ. स्नेहल वराडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे नियोजन न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. सुनिल विधाते यांनी पाहिले.
