दिवंगत कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती पुरस्काराचे ०५ एप्रिल रोजी वितरण ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे आणि चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार यांची प्रमुख उपस्थिती…

Screenshot_2026-04-01-19-57-20-67_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा (अनिल दराडे )दुसरबीड येथील सावित्रीबाई मंगल कार्यालयात दिनांक ०५ एप्रिल रोजी दिवंगत कवी डॉ. विशाल इंगोले स्मृती राज्यस्तरीय साहित्यकृती पुरस्कार वितरित केला जाणार आहे. हा पुरस्कार ज्येष्ठ कादंबरीकार बाबाराव मुसळे यांच्या हस्ते आणि सुप्रसिद्ध चित्रपट गीतकार डॉ. विनायक पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ मार्गदर्शक तळेकर गुरुजी अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत.बुलढाणा जिल्ह्यातील प्रथितयश कवी डॉ. विशाल इंगोले यांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी लोकजागर परिवार आणि मित्र मंडळाच्या वतीने मागील वर्षीपासून त्यांच्या नावे उत्कृष्ठ कवितासंग्रहास पुरस्कार देणे सुरू केले आहे. या वर्षीचा पुरस्कार कवी तान्हाजी बोऱ्हाडे यांच्या जळताना भुई पायतळी या कवितासंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन लोकजागर परिवार व डॉ विशाल इंगोले मित्र परिवार संयोजन समितीतील सदस्यांनी केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!