मेहकर तालुक्यात ९८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर;
Oplus_16777216
मेहकर (एकनाथ माळेकर जिल्हा प्रतिनिधी ) मेहकर तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या 2025 – 2030 पंचवार्षिकसाठी सरपंच पदाचे आरक्षण ८ जुलै रोजी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नीलेश मडके यांच्या अध्यक्षतेखाली निश्चित करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार एस.यू., कावळे, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी 98 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे हे आरक्षण खालील प्रमाणे आहे
आरक्षणानुसार गावांची यादी
अनुसूचित जाती : सारंगपूर, सोनाटी, फैजलापूर, लोणी गवळी, वरवंड, गजरखेड, देऊळगाव माळी, वर्दळी वैराळ, कळपविहीर, घाटनांद्रा, मोळा
अनुसूचित जाती महिला :
बान्हई, लव्हाळा, चायगाव, बरटाळा, आंधृड, वरदडा, सावंगीवीर, लावणा, आरेगाव, सोनारगव्हाण, सोनार पांगरखेड.
अनुसूचित जमाती : पारडा, कासारखेड, सारशिव
अनुसूचित जमाती महिला : मादणी, शहापूर, मारोतीपेठ
ओबीसी (नागरिक मागासवर्ग)
: वडगाव माळी, कल्याणा, उमरा, सावत्रा, कनका बुद्रुक, विवेकानंदनगर, माळेगाव, जनुना, पिंपळगाव उंडा, बेलगाव, शेंदला, वरूड, खंडाळा.
ओबीसी महिला (नागरिक मागासवर्ग महिला): लोणी,
उसरण, शिवाजीनगर, दुधा, थारबर्दापूर, हिवरा खुर्द, जवळा, चिंचोली बोरे, नायगाव, मोहना खुर्द, अकोला ठाकरे, वडाळी, घुटी.
सर्वसाधारण : अंत्री देशमुख, उटी, नायगाव,
पेनटाकळी, परतापूर, भोसा, मोळी, मुंदेफळ, मांडवा फॉरेस्ट, लोणी, सुकळी, हिवरखेड, विठ्ठलवाडी, कळंबेश्वर, घाटबोरी, जानेफळ, बोथा, ब्रह्मपुरी, गोमेधर, मांडवा समेत डोंगर, मोहना बुद्रुक, नागापूर.
सर्वसाधारण महिला : उकळी,
कंबरखेड, दुगबोरी, पिंप्री माळी, पारखेड, बदनापूर, बाभूळखेड, भालेगाव, मिस्किनवाडी, साब्रा, हिवरा साबळे, वागदेव, अंजनी बुद्रुक, बोरी, डोणगाव, देऊळगाव साखरशा, दादूलगव्हाण, गोहोगाव, गणपूर, शेलगाव देशमुख, शेलगाव काकडे, विश्वी. देऊळगाव साखरशा, डोणगाव या प्रतिष्ठेच्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद पुन्हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे मेहकर तालुक्यातील 98 ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग वाजले असून, गावपातळीवर नवे राजकीय समीकरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे!
