रिपाई आठवले गटाच्या वतीने बुलढाणा ठाणेदार संग्राम पाटील यांचा बाबासाहेब जाधव यांनी केला भव्यदिव्य सत्कार….
सिंदखेडराजा( अनिल दराडे)मातृतीर्थ बुलडाणा शहर पुलीस ठाण्याचे नवनियुक्त धाडसी व शिस्तप्रिय पोलीस अधिकारी खमक्या, दबंग अधिकारी म्हणून ओळख असलेले ठाणेदार संग्राम पाटील यांची बुलडाणा शहर पुलीस ठाण्याच्या ठाणेदार पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी पदभार स्वीकारताच शहरातील गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली आहे. अशा संविधानीक मार्गाने चालणाऱ्या पोलीस सेवेत 15 वर्षांहून अधिक काळामध्ये उल्लेखनीय सेवा केलेल्याबद्दल त्यांना पोलीस महासंचालक पदाने सन्मानित केले आहे अशा कर्तव्यदक्ष ठाणेदार संग्राम पाटील यांचा बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाच्या वतीने बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली, जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, भिमरत्न पुरस्कार प्राप्त समाजभूषण ज्येष्ठ नेते प्रा.इंजि. भैयासाहेब पाटील, रिपाइं विदर्भ कार्यध्यक्ष बुलडाणा जिल्ह्याची तोफ पॅंथर मुरलीधरजी गवई,दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे प्रदेशप्रवक्ते आदर्श शिक्षक निरंजन जाधव, मराठा संघाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ शिंदे, रिपाइं जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा प्रमुख नबाब मिर्झा बेग, महासचिव निळकंठदादा सोनोने,जिल्हा कार्यध्यक्ष प्रा. मुक्तार पठाण सर, महीला जिल्हाध्यक्ष वंदनाताई वाघ,रोशनीताई कबीरदास,जिल्हा संघटक संपर्क प्रमुख इंजि.शरद खरात, जिल्हा युवाध्यक्ष प्रकाश पाटील (म्हस्के), विदर्भ महीलाउपाध्यक्षा आशाताई वानखडे, जिल्हाउपाध्यक्ष भगवान इंगळे,भाऊसाहेब वानखडे,इंजि. राजेश सरकटे,विदर्भ उपाध्यक्ष रामेश्वर वाकोडे, विदर्भ सचिव दलीत मित्र विजय सपकाळ, सर्वश्री तालुकाध्यक्ष बुलडाणा केशवराव सरकटे, मोताळा बाळासाहेब आहीरे, चिखली हीम्मतराव जाधव, भानुदास शेजूळ सिं.राजा, सरपंच रामदास कहाळे,पत्रकार विजय भालमोडे, रमेश पिंपळे,देऊळगाव राजा प्रदिप मुखदयाल,आकाशभैया साळवे, सुधीरदादा हिवाळे,मेहकर राणा मोरे, फौजी राहुल अवसरमोल, लोणार समाधानजी सरदार, मलकापूर दिलीप इंगळे,नांदुरा पत्रकार शैलेश वाकोडे, जळगाव जामोद संतोष वानखडे, संग्रामपूर बाबूलाल इंगळे, शेगाव विलास गव्हांदे, बुलढाणा तालुकाउपाध्यक्ष इंजि. भास्करराव जाधव, आल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष सैय्यद नाजीम, जिल्हा महासचिव विजय साबळे सम्राम पाटील यांचा पुष्पगुच देऊन त्यांच्या शासकीय पोलीस स्टेशन कार्यालयात यथोचित सत्कार केला व त्यांना पूढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. नंतर सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा परिचय बाबासाहेब जाधव यांनी करून दिला. संग्राम पाटील हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील असलेले लहान पणापासून अभ्यासू वृत्ती असल्यामुळे त्यांनी कठीण असी कृषी शाखेची एमएससी पदी संपादन केलेकृषी शाखेचे पदवीधर झाले. अभ्यासू वृत्ती असल्याने त्यांनी जिद्दीने व चिकाटीने मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा सेवा आयोगाचा अभ्यास केला व पहील्याच प्रयत्नात सर्वोच्च गुण मिळवून उत्तीर्ण झालेले व सन 2008 मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून निवड त्यांची पोलीस सेवेत रूजू झाले.पुणे ग्रामीण, मुंबई शहर पोलीस दल,बुलढाणा चिखली,साखरखेडा,धाड, धामणगाव बढे इत्यादी ठिकाणी ठाणेदार पदी उल्लेखनीय कार्य केले धाड, चिखली सारख्या संवेदनशील परिसरात त्यांनी कायदा, शांतता सुव्यवस्था कायम टिकवून राहावी यासाठी सोशल पोलिसिंग पध्दत त्यांनी अवलंबिली होती, कोणताही अवाजवी हस्तक्षेप, दबाव याला न जुमानता नि:पक्ष संविधानीक कायद्याच्या चौकटीत राहून सामान्य व गरजू लोकांना त्यांनी न्याय मिळवून दिला असी आज पर्यंत ख्याती आहे. पोलीस पाटील, शांतता समिती व सामाजिक कार्यकर्ते तसेच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकार यांचे सोबत समन्वय ठेवून त्यांनी विधायक उपक्रम राबविले पत्रकार मित्र म्हणून ओळख असलेले नवनियुक्त बुलढाणा शहराचे ठाणेदार संग्राम पाटील हे धाडसी व शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून जिल्ह्यात त्यांची ख्याती आहे. बुलडाणा शहराचा पोलीस ठाण्याचा कारभार त्यांच्या हाती आल्याने,शहरातील गुन्हेगारीवर कडक नियंत्रण येणार, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवत गुन्हेगारांना वचक बसवणारा खमक्य ठाणेदार म्हणून संग्राम पाटील यांच्याकडून बुलडाण्यात दमदार कामगिरीची अपेक्षा नागरिकांमध्ये आशा व्यक्त होत आहे. सत्कार प्रसंगी पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी सांगितले की,आरपीआय आठवले गटाचे आपल्या चांगल्या कामासाठी संपूर्ण सहकार्य राहील व पुढील भावी वाटचालीस रिपाइं तर्फे शुभेच्छा दिल्या व शुभ कामना केली. सत्कारास उत्तर देतांना म्हणाले की, चांगल्या कामासाठी तुम्ही केव्हाही या तूमच्या साठी माझ्या कार्यालयाचे चोविस तास दरवाजा उघडा आहे. तूमच्या कडून सहकार्याची व चांगल्या कामाची मला अपेक्षा आहे.
