सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील लाईट नसल्यामुळे अनेकांची कामे खोळंबली ।दूरवरून आलेल्या वृद्ध महिलांचा हिरमोड जनरेटर बनले शोभेची वास्तू…

0
Screenshot_2026-05-06-21-40-19-47_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

बुलढाणा (सचिन खंडारे)एका बाजूला महाराष्ट्र सरकार गतिमान शासन सरकार आपल्या दारी अशा विविध योजना राबवित असताना मात्र मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालय मात्र वाऱ्यावर सोडले आहे की काय असे वाटत आहे ‘याचं झालं ही तसंच दिनांक ६ मे रोजी नेहमीप्रमाणे तहसील कार्यालय ११ वाजता सुरू झालेसिंदखेडराजा तहसील कार्यालयाचा विस्तार हा मोठा असल्यामुळे व तालुक्यात अनेक गावे दूर दूर असल्यामुळे खेडेगावातील नागरिक कामानिमित्ताने थोडे उशिरा येत असतात , जसे साखरखेर्डा शिंदी पिंपळगाव सोनारा सवडद मोहाडी , पांगरी काटे , रताळी ‘सायाळा ‘ राजेगाव , असे अनेक गावांमधून नागरिक कामानिमित्त तहसील कार्यालय मध्ये जात असतात ‘ यामध्ये शालेय काम इतर शेतीची कामे असतात ‘ मात्र सिंदखेडराजा तहसील कार्यालय मध्ये तहसीलदार अजित दिवटे हे शासकीय कामानिमित्त बाहेर दौऱ्यावर होते ‘ त्यानंतर अनेक विभागातील कर्मचारी लाईट नसल्यामुळे बाहेर वारंवार येत होते फक्त महिला कर्मचारी आपल्या जागेवरच कामांमध्ये व्यस्त होत्या , लाईट नसल्यामुळे दूर दुरून महिला संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाबाहेर खूप वेळापर्यंत बसलेले होत्या , त्यांना ना पिण्यासाठी पाणी होते ना काही ‘ मात्र संजय गांधी निराधार योजना कार्यालयातील कर्मचारी मात्र वारंवार चहापाणी घेण्याकरता बाहेर जात होते ‘ निवडणूक विभागाच्या कार्यालयात फक्त एकच कर्मचारी हजर होता ‘दोन नायब तहसीलदार असलेल्या कार्यालयात नायब तहसीलदार हजर होते मात्र लाईट नसल्यामुळे अनेकांची तारांबळ त्या ठिकाणी झाली होती ‘ पंखे बंद असल्यामुळे अनेकांना त्रास झाला ‘तहसीलदार यांच्या केबिन समोर फक्त कर्मचारी उपस्थित होते ‘त्याचबरोबर लागून असलेल्या केबिनमध्ये सुद्धा तीन-चार कर्मचारी हजर होते ,सर्वात महत्त्वाचा विभाग असलेल्या राशन विभागाच्या कार्यालयात मात्र एकही कर्मचारी हजर नव्हता याला कारण हे कदाचित लाईट नसल्यामुळे असेल परंतु सरकार करोडो चा निधी शासकीय कामकाजावर खर्च करत असताना सिंदखेडराजा तहसील कार्यालय मात्र लाईट नसल्यामुळे बंद राहते यापेक्षा कुठलीही मोठी गोष्ट नाही ,अनेकांचे खरेदी विक्रीचे व्यवहार बंद होते , शाळेचे दाखले यापेक्षाही संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयाबाहेर 20 ते 25 महिला त्या सुद्धा वयोवृद्ध बसलेल्या होत्या ‘बाहेर असलेले जनरेटर मात्र तीन वर्षापासून बंद आहे जर शासकीय कार्यालयामध्ये आणि तहसील कार्यालयामध्ये जर लाईट नसेल तर कामकाज बंद पडते याकरिता जनरेटरची सुविधा असते , मात्र बाहेर असलेले जनरेटर सुद्धा शोभेची वास्तू बनले आहे , जनरेटर मध्ये तांत्रिक बिघाड असू शकते मात्र आतापर्यंत जनरेटर दुरुस्त का केले नाही हाही प्रश्न निर्माण होत आहे .याबाबत सिंदखेडराजा तहसीलदार यांना दूरध्वनी केला असता त्यांनी फोन उचलला नाही ‘सदर दिवसभर कामकाज ठप्प असल्यामुळे दूरवरून आलेल्या नागरिकांचा हिरमोड झालाच परंतु त्यांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सुद्धा झाला आहे ‘त्यामुळे कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे तहसीलदार यांचा कर्मचाऱ्यावर आहे की नाही अशी संतप्त प्रक्रिया नागरिकांमधून उमटत होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!