चिखली येथे बॉम्बे मार्केटमध्ये भीषण आग; पेट्रोल पंप शेजारी भंगार दुकान जळून खाक…

0
IMG-20260507-WA0093

प्रतिनिधी:-निलेश कोल्हे

चिखली :-शहरातील गजबजलेल्या बॉम्बे मार्केट परिसरात भीषण आग लागल्याची घटना दिनांक ०७ मे २०२६ रोजी दुपारच्या सुमारास चिखली येथील बॉम्बे मार्केटमध्ये भंगार दुकानाला आग लागून दुकान जळून खाक झालेची घटना घडली. सविस्तर वृत्त असे की, चिखली शहरातील जय स्तंभ चौका पासून काहीच अंतरावर असलेल्या भंगार दुकानाला अचानक भीषण आग लागल्याने चिखली शहरात एकच खळबळ उडाली बोंद्रे पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या जाहीर खान कुरेशी यांच्या भंगार दुकानाला अचानक आग लागल्याने परिसरात धुरांचे प्रचंड लोट पसरले आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग इतकी भीषण होतील की काही क्षणातच दुकानातील मोठ्या प्रमाणातील भंगार साहित्य जळून खाक झाले प्राथमिक अंदाजानुसार या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे विशेष म्हणजे पेट्रोल पंपाच्या अगदी शेजारीच आग लागल्यामुळे काही काळ परिसरात मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभाग आणि पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक व्यापारी आणि अग्निशामक कर्मचारी यांनी शर्तीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली आग विझवण्याच्या कार्यात उपनगराध्यक्षपदी कपिल खेडेकर व पाणीपुरवठा सभापती दत्ता सुसर यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही पुढाकार घेत मदत कार्य केले दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस आणि संबंधित नियंत्रणेकडून तपास सुरू आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण चिखली शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!