आमदार रोहित पवार यांनी घेतले श्री बालाजी महाराजांचे दर्शन संस्थांच्या वतीने वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्या हस्ते सत्कार….
सिदखेडराजा (अनिल दराडे) आमदार रोहित पवार हे दिनांक ०७ मे रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी शेगाव येथे श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव राजवाड्यातील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी भेट देऊन अभिवादन केले. आमदार रोहित पवार यांनी दुपारी १२:३० वाजता प्रतितिरुपती मानल्या जाणाऱ्या श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेतले आणि संस्थानचा इतिहास समजून घेतला. याप्रसंगी श्री बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांनी संस्थानच्या कार्यालयात त्यांचा शाल, पुष्पहार आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी श्री बालाजी संस्थानचे व्यवस्थापक किशोर बिडकर, कर्मचारी, पुजारीवृंद, राजे भागवत जाधव, राजे बाळासाहेब जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच इतर नागरिक उपस्थित होते.
