जनगणना २०२६: चूक नको, वेळ नको!’ एसडीओ खडसे यांचा अधिकारी-कर्मचाऱ्यांना कडक इशाराअचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करा घरयादी गणना’ – ऑनलाईन आढावा बैठकीत आदेश; सिंदखेड- देऊळगावसाठी ५२९ प्रगणकांची नियुक्ती..
सिंदखेड राजा (अनिल दराडे) देशातील सर्वात मोठी लोकशाही प्रक्रिया म्हणजे जनगणना. आणि तीही यंदा ‘डिजिटल’ मोडमध्ये! या महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालय, सिंदखेड राजा यांच्या वतीने जनगणना २०२६ चा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीचे अध्यक्षस्थान उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी भूषवले.कामात हलगर्जी नको!’ – एसडीओंचा सज्जड दमबैठकीत जनगणना प्रक्रियेचे नियोजन, प्रगणक व पर्यवेक्षकांची नियुक्ती तसेच तालुकानिहाय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी एसडीओ खडसे यांनी सर्व अधिकारी, पर्यवेक्षक व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. “घरयादी गणना अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करणे ही जबाबदारी आहे. कामात कसलीही हलगर्जी खपवून घेतली जाणार नाही,” असा कडक इशारा त्यांनी दिला. याशिवाय डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर, माहिती संकलन प्रक्रिया आणि क्षेत्रीय समन्वय याबतही त्यांनी मार्गदर्शन केले.’या’ तालुक्यांसाठी किती कर्मचारी?बैठकीत सादर केलेल्या विवरणपत्रानुसार सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यासाठी कर्मचारी संख्या निश्चित करण्यात आली आहे:अ. क्र. तालुक्याचे नाव शहरी / ग्रामीण प्रगणक संख्या पर्यवेक्षक संख्या1 सिंदखेड राजा शहरी 28 52 सिंदखेड राजा ग्रामीण 268 453 देऊळगाव राजा शहरी 71 124 देऊळगाव राजा ग्रामीण 162 26एकूण सिंदखेड राजा व देऊळगाव राजा मिळून ५२९ प्रगणक व ८ पर्यवेक्षक ही जनगणनेची जबाबदारी पार पाडणार आहेत.बैठकीस सर्व पर्यवेक्षक, कर्मचारी तथा अधिकारी उपस्थित होते. जनगणना २०२६ हे महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्य असून नागरिकांनी प्रशासनास आवश्यक सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रगणक दारी आल्यास योग्य ती माहिती देऊन ‘आपला देश, आपली जनगणना’ यशस्वी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
