अन्न व औषध प्रशासन आणि साखरखेर्डा पोलिसांची धडक कारवाई , साखरखेर्डा येथे १८ लाखांचा गुटखा जप्त .

0
IMG-20260618-WA0014

साखरखेर्डा ( एकनाथ माळेकर) गेल्या अनेक वर्षांपासून साखरखेर्डा येथे अवैध गुटखा विक्री होत असून अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक भुमिकेमूळे आज अन्न व औषध प्रशासन अधिकारी आणि साखरखेर्डा पोलिसांनी धडक कारवाई करीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून १८ लाख ९ हजार ८१ रुपयांचा गुटखा जप्त केला आहे . मात्र यातील दोन आरोपी फरार झाले आहे . आज १७ जून रोजी सकाळी ७ वाजता साखरखेर्डा येथे अन्न व औषध प्रशासन अधिकारी प स भोपळे यांनी गुटखा माफीयांची माहिती घेत साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन करेवाड यांच्या सहकार्याने सकाळी शेख ईब्रान शेख चाँद कुरेशी यांच्या घरावर छापा टाकला असता , शेख ईब्रान यांच्या घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीतून अनेक प्रकारचा गुटखा जप्त केला . त्या गुटख्याची खुलेआम बाजारात विक्री केली जायची . जप्त करण्यात आलेला गुटखा ६ लाख ७२ हजार ९११ रुपयांचा आहे . तर दुसरी कारवाई शेख मुस्ताक शेख खलील यांच्या निवासस्थानी केली असता तेथे १२ प्रकारचा गुटखा आढळून आला . पोलिसांनी पंचनामा केला असता ११ लाख ४९ हजार १० रुपयांचा गुटखा जप्त केला . ज्यावेळी ही कारवाई करण्यात आली त्यावेळी दोन्ही आरोपी फरार झाले होते . जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे , अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकात अन्न व औषध प्रशासन अधिकारी प स भोपळे , ठाणेदार गजानन करेवाड , पी एस आय गणेश डोईफोडे , पी एस आय बाजड , पो काॅ गजानन दराडे , दिनेश बकाले , युवराज राठोड , ज्ञानदेव टेकाळे , मनोज खर्डे. , रोहिदास पवार , लक्ष्मण इनामे , जनाबाई केवट सहभागी झाले होते . दोन्ही आरोपी विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून यात आणखी काही आरोपी निष्पन्न होतात का याचा शोध पोलीस करीत आहेत . या धडक कारवाईमुळे सकाळी अनेक पान टपऱ्या , किराणा दुकान बंद करून निघून गेले होते . गावात शुकशुकाट पसरला होता . ही कारवाई सकाळपासून सुरू झाली होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!