लोणार तालुक्यात वनरक्षकावर झालेल्या हल्ल्याबाबत संघटना आक्रमक. निवेदन देऊन फॉरेस्टर्स आणि फॉरेस्ट गार्डस् असोसिएशनच्या वतीने घटनेचा तिव्र निषेध. कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्याची गय केले जाणार नाही जिल्हाध्यक्ष गजानन पोटे.

0
IMG-20260618-WA0013

चिखली (एकनाथ माळेकर) बुलढाणा वनविभागामधील मेहकर प्रादेशिक अंतर्गत कार्यरत असलेल्या श्री कैलास धनगर वनरंक्षक हे त्यांचे अधिनस्त असलेल्या नियत क्षेत्र गंधारी या ठिकाणी उत्खनन होत असल्याचा मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गंधारी नियत क्षेत्र मध्ये गस्ती करीता गेले त्यावेळी त्यांना काही इसम हे राखीव वनामध्ये अवैध रित्या जेसीबी साहाय्याने मुरुम उत्खनन करतांना आढळुन आले. त्यावेळी अवैध उत्खनन करणारे इसम यांना रोखण्याकरीता गेले असता उत्खनन करते इसम यांनी कुठलाही विचार न करता श्री कैलास धनगर वनरक्षक यांच्या अंगावर धावुन आले तसेच त्यांना शिवीगाळ करत यांना दगड व लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये ते गंभीररित्या जखमी झाले. सदर हल्लाचा फॉरेस्टर्स आणि फॉरेस्ट गार्डस् असोसिएशन, ठाणा शाखा – बुलढाणा तिव्र निषेध नोंदविला असून. सदर हल्याचे गंभीरता पाहता वनरक्षक लोणार श्री कैलास धनगर यांनी लोणार येथील पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल केली.सदर तक्रारीला २ दिवस होऊन देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही हल्लाखोरांवर झालेली नाही.तरी आपल्या स्तरावरुन वरील घटनेचा अनुषंगाने आपणास विनंती करण्यात येते की,सदर घटनेतील हल्लेखोर यांची कसून चौकशी करण्याची आदेश संबधीतास देऊन दोषी याना कठोरात कठोर शिक्षा व्हावी जेणेकरुन वनविभागाच्या कर्मचारी यांचे मनोबळ खच्चीकरण न होता मनोधैर्य वाढेल तसेच अशा गुंडप्रवृत्तींना कायदाचा जरब बसेल तसेच यानंतर अशा घटनेची पुनवृत्ती होणार नाही याबाबत प्रतिबंधनात्मक उपाय अशा ठोस योजना कराव्यात ही अशी नम्र विनंती संघटनने उपवनसंरक्षक यांना निवेदन देऊन केली असून उपवनसंरक्षक बुलडाणा यांना निवेदन देते वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री गजानन पोटे,वनपाल, वनरक्षक व कर्मचारी हजर होते. गजानन पोटे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी संघटनेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झाल्यास त्याची गय केले जाणार नाही असे दूरध्वनीवरून माहीती सांगितली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!