राजेंद्र बुधवत यांची शिवसेना (उ.बा.ठा. गट) तालुकाध्यक्षपदी निवड तौफिक कुरेशी तर्फे विशेष सत्कार

IMG-20250717-WA0003

लोणार (यासीन शेख) :शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) च्या लोणार तालुकाध्यक्षपदी नुकतीच राजूभाऊ बुधवत यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा सत्कार मा.नगरसेवक तथा बांधकाम सभापती तसेच काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे तालुका अध्यक्ष मो.तौफीक हाजी अब्दुल् लतीफ कुरेशी यांच्या निवासस्थानी करण्यात आला.
या वेळी तौफीक कुरेशी यांनी राजूभाऊ बुधवत यांचे विशेष कौतुक करून, लोणार-मेहकर विधानसभा मतदारसंघात बळकटीने काम करत राहावे अशा शुभेच्छा दिल्या. सर्व राजकीय मतभेद बाजूला ठेवून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राजूभाऊ बुधवत यांनी आपल्या नवीन जबाबदारी विषयी समाधान व्यक्त करत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार सरणीनुसार तालुक्याच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार आहे. लोणार-मेहकर मतदारसंघात संघटन बळकट करण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
सत्कार प्रसंगी श्रीकांत नगरे, गजानन मोरे, अश्रुधारकर, इकबाल कुरेशी, परवीन सरदार, मुंशीभाई कुरेशी, पप्पू सर, मूसा लीडर, हमीद कुरेशी, इरफान कुरेशी, शहेद कुरेशी, रफिक कुरेशी, अजीम कुरेशी, तौसीफ कुरेशी (मा. शहराध्यक्ष युवक काँग्रेस), आकीब कुरेशी (जिल्हा उपाध्यक्ष NSUI) तसेच काँग्रेस आणि अन्य पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन वकार अहेमद उर्फ पप्पू सर यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!