हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत पंचनाम्याची सह आर्थिक मदतीची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) गजानन वायाळ जिल्हा उपाध्यक्ष यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन….
चिखली (एकनाथ माळेकर ) – चिखली तालुक्यात सध्या हुमणी अळीने मोठे थैमान घातले असून शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक रोप अवस्थेतच नष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) गजानन वायाळ जिल्हा उपाध्यक्ष आणि चिखली तालुक्याच्या वतीने तहसीलदार चिखली यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, हुमणी अळी पिकांच्या मुळावर हल्ला करत असल्यामुळे संपूर्ण पीक उध्वस्त होत असून अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे.
पक्षाच्यावतीने प्रशासनाकडे पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:
1. चिखली तालुक्यातील सर्व गावांमध्ये हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत.
2. या नुकसानीचा समावेश पीक विमा योजनेत करण्यात यावा.
3. दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी.
4. कृषी विभागामार्फत प्रभावी नियंत्रणासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात.
“शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. तो सध्या अडचणीत असून शासनाने त्वरित मदत करावी,” अशी मागणी निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
हे निवेदन उपजिल्हा अध्यक्ष गजानन वायाळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, कृष्णा मिसाळ, नारायण चित्राळे, नंदू अंभोरे, गजानन काकडे, रहीम खान पठाण,या सह शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.
