शाळेचा पहिला दिवस नवीन विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत पुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न……

IMG-20250623-WA0038

लोणार (यासीन शेख)सरदार वल्लभाई पटेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येवती येथे आज दिनांक 23 जून 2025 शाळेचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक शबी.एस.नागरे सर व सर्व शिक्षक शिक्षकांच्या कर्मचारीरुंद यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.त्यानंतर वर्ग पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय पुस्तकांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बी.एस .नागरे सर व प्रमुख पाहुणे थोरवे सर हे होते. याप्रसंगी राऊत सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गीते सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.रवी जाधव यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!