एक मदतीचं पाऊल आपल्या गांवासाठी साठी….एक पाऊल नवीन पिढी घडवण्यासाठी,चांगल्या कामासाठी …

0
IMG-20260425-WA0012

सिंदखेडराजा (अनिल दराडे) पंचक्रोशीतील सर्व मंडळींनी आपल्या पुर्वजांच्या आठवणी,स्मरण म्हणून हे करणं आहे कारण ते पहेलवान होते,आपल्या गांवाची ओळख पहेलवान म्हणून होती आणि पूर्वजांचाच वसा आणि वारसा म्हणून ही सुरवात करीत केली आहे… दिनांक 24.04.2026 वार शुक्रवार रोजी पिंंपळगांव बु ता.देऊळगांव राजा येथे जय हनुमान आखाडा पिंपळगाव बु च्या वतीने कुस्ती आखाडा मैदान भव्य दंगल,पार पडली. या साठी पंचकृशीतील नागरीक,तरूण मित्र,बाहेर गांवातहून आलेले कुस्ती प्रेमी व संभाजी नगर,जालना,वाशीम,हिंगोली,बुलढाणा जिल्ह्यातील अनेक पैलवानांनी भाग घेतला…शेवटच्या कुस्ती साठी चांदीची गदा ही स्व: बाबुरावजी काकड यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबीयां कडून देण्यात आली ..कुस्त्या मधे लहाण मोठ्या दहा रूपया पासुन ते चांदीची गदा व ५०००/-₹ रोख रक्क्म असे पैलावानांच्या कुस्त्या लावुन लाखो रूपयाची लुट करण्यात आली…शेवटची फायनल कुस्ती *रामा सुरेश वाघ पिंपळगांव बु याने चांदीची गदा व ५०००/₹ रोख रक्कम पटकवली.. पैलवान यांनी उपस्थित राहुन शोभा वाढवली व सहकार्य केले.. यासाठी गावातील पंच कमिटी व समस्त गावकरी तरुण वर्ग व मुख्य तरुण वर्ग व मुख्यतः जुने पैलवान यांनी पुढाकार घेऊन गावात आखाडा परंपरा सुरू केली त्यामुळे अनेक त्यामुळे अनेक तरुण प्रभावित होऊन भविष्यात रामा वाघ याच्या सारखे मेहनत करून उदयास येतील..पुढील वर्षी ही अपेक्षाही भव्य दिव्य मोठ्या स्वरूपात कुस्तीची दंगल होईल व त्यासाठी पैलवानांनी हजर राहावे असे आवाहन हनुमान आखाडा पिंपळगाव बु यांनी केले.*शेवटी हनुमान आखाडा पंच कमेटी तथा गावकरी मंडळी पिंपळगांव बु|| ता.दे.राजा यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!