कसोटीमध्ये सर्वात जलद त्रिशतक झळकावणारे टाॅप-5 फलंदाज कोण? जाणून घ्या एका क्लिकवर
त्रिशतक हे कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाची क्लास, धैर्य आणि आक्रमकता या सर्वांचे सर्वात मोठे प्रमाण असते, पण काही फलंदाज असे आहेत ज्यांनी केवळ 300 धावा पूर्ण केल्या नाहीत, तर या काळात त्यांचा उत्कृष्ट स्ट्राइक रेट देखील राहिला आहे.
चला तर मग या बातमीद्वारे आपण कसोटी इतिहासात सर्वात जलद त्रिशतक झळकावणारे आणि क्रिकेट जगाला धक्का देणाऱ्या 5 फलंदाजांबद्दल जाणून घेऊयात.
1) वीरेंद्र सेहवाग (भारत)- भारतीय संघाचा माजी विस्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने हा पराक्रम 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केला होता. त्याने केवळ 278 चेंडूंमध्ये 300 धावा पूर्ण करत कसोटी क्रिकेटमधील सर्वात जलद त्रिशतकाचा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला होता. सेहवागच्या या डावात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला होता. त्याचा रेकाॅर्ड आजही कोणत्याही खेळाडूला मोडता आलेला नाही.
2) विआन मुल्डर (दक्षिण आफ्रिका)- अलीकडेच झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटीत विआन मुल्डरने नाबाद 367 धावांची संस्मरणीय खेळी केली. त्याने या डावात 49 चौकारांसह 4 षटकार, म्हणजेच एकूण 53 बाउंड्री मारल्या. त्याने आपले तिहेरी शतक केवळ 297 चेंडूंमध्ये पूर्ण केले होते.
3) हॅरी ब्रूक (इंग्लंड)- इंग्लंडचा युवा स्टार हॅरी ब्रूकने 2024 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आक्रमक शैलीत 310 चेंडूंमध्ये 300 धावा पूर्ण केल्या होत्या. हा डाव इंग्लंडच्या आक्रमक कसोटी खेळण्याच्या शैलीचे, म्हणजेच ‘बेझबॉल’चे उत्कृष्ट उदाहरण होता. ब्रूकने या डावातून स्वतःला जगातील शीर्ष फलंदाजांमध्ये समाविष्ट केले.
4) व्हॅली हॅमंड (इंग्लंड)- 1933 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध व्हॅली हॅमंडने 355 चेंडूंमध्ये 300 धावा पूर्ण केल्या होत्या. त्या काळात जिथे धावा काढण्याचा वेग हळू होता, तिथे हॅमंडची ही खेळी अत्यंत वेगवान मानली जात होती. त्याने आपल्या टेकनीकने आणि टायमिंगने हा पराक्रम करून दाखवला
5) मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया)- या यादीत पाचव्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर मॅथ्यू हेडन आहे. त्याने 2003 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 362 चेंडूंमध्ये त्रिशतक शतक झळकावले होते. हा डाव ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी वैयक्तिक खेळी म्हणून ओळखला जातो. या डावात त्याने शानदार 380 धावा केल्या होत्या.
